९ व्या वर्गात शिकत असलेल्या तरुणाची आत्महत्या

39

चिमूर तालुक्यातील घटना : आत्महत्येचे कारण अस्पस्ट

चंद्रपूर

.        चिमूर तालुक्यातील बेलारा येथील 9 व्या वर्गात शिकणाऱ्या 15 वर्षीय मुलाने राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली.

.        बेलारा येथील करण मारोती गुरणुले (१५ ) असे मृतक मुलाचे नाव आहे तो मदनापूर येथील जय लहरी जय मानव विद्यालय येथे ९व्या वर्गात शिकत होता, १७ ऑक्टोबर ला दूपारी ३.३० वाजताच्या दरम्यान सदर घटना उघडकीस आली.

.        तब्बेत बरी नसल्याने काही दिवस करन शाळेत गेला नव्हता. आज शाळेत जातो म्हणुन गणवेश व बॅग घेऊन तयारी केली. मात्र घरी कुणीही नसल्याचे पाहुन त्याने दोराने गळफास लावुन आत्महत्या केली. दुपारी मोठा भाऊ घरी आल्या नंतर हि घटना उघडकीस आली. घटनेची माहीती चिमूर पोलिसांना देण्यात आली.

.        पोलिसांना माहिती मिळताच पोलिस निरीक्षक मनोज गभने,पोलिस उप निरीक्षक भिष्मराज सोरते,पोलिस कर्मचारी भारत घोळवे, राहुल चांदेकर यांचेसह घटनास्थळावर पोहचुन घटनेचा पंचनामा केला. प्रेत उत्तरीय तपासणीसाठी उप जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. आत्महत्येचे कारण अजुन स्पष्ट झाले नसुन पुढील तपास सुरु आहे.