अंबर जिवतोडे यांचा थेट जनतेशी संवाद
नंदोरी-मांगली जिल्हा परिषद क्षेत्राचा लेखाजोखा
विविध गावांत मोफत ऑनलाईन सेवा कार्यक्रमाचे आयोजन
करण ठाकरे
चंद्रपुर : जिल्हा परिषदेच्या क्षेत्रात कार्यकर्ते आणि जनतेमधील संवाद वाढवण्यासाठी, नंदोरी मांगली जिल्हा परिषद क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर करून अधिकाधिक माहिती अंबर जिवतोडे जनतेपर्यंत पोहोचवत आहेत. यामध्ये, लोकांच्या समस्या ऐकणे, त्यांचे निराकरण करणे आणि जिल्हा परिषदेच्या योजनांची माहिती देणे यावर लक्ष केंद्रित करण्याच काम अंबर जिवतोडे करीत आहे. तसेच मोफत ऑनलाईन सेवा कार्यक्रमाचे आयोजन विविध गावांत केले जात आहे. या उपक्रमातून शासनाच्या विविध योजनांचा लाभ सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
![]()
. नंदोरी मांगली जिल्हा परिषद क्षेत्रात डिजिटल युगात तंत्रज्ञानाचा वापर करून जनतेशी संवाद साधत आहे. शासनाच्या योजना आणि उपक्रमांची माहिती वेळेवर आणि योग्य ठिकाणी पोहोचवण्यासाठी मदत दिली जात आहे. जनतेच्या समस्या प्रत्यक्ष ऐकण्यासाठी अंबर जिवतोडे हे थेट गावोगावात भेटी देत त्यांच्या समस्याचे निराकरण करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. सोबतच शासनाच्या विविध योजना लोकांपर्यंत पोहोचवून त्यांचे फायदे समजावून सांगत आहेत.
![]()
या आहे मोफत ऑनलाईन सेवा शिबिरामध्ये लाडकी बहीण योजना, जनआरोग्य योजना, शेतीविषयक अनुदान योजना, तसेच इतर महत्वाच्या शासन योजनांचे केवायसी (KYC) व ऑनलाइन नोंदणी मोफत करण्यात येत आहे.
मोफत ऑनलाईन सेवेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद या उपक्रमाला विविध गावांतील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहेत. महिला, युवक, तसेच ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होत शासनाच्या योजनांचा लाभ घेत आहे. गावकरी या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त करत अंबर जिवतोडे यांचे मनःपूर्वक आभार मानत आहे.


