Home सामाजिक वरोऱ्यात सहाय्यक शिक्षक संजय बोधे यांच्या कार्याचा गौरव

वरोऱ्यात सहाय्यक शिक्षक संजय बोधे यांच्या कार्याचा गौरव

517

वरोरा येथे भव्य सेवापूर्ती गौरव सोहळा

धनगर कर्मचारी अधिकारी संघटना व अहिल्यादेवी समितीचे आयोजन 

वरोरा :  अहिल्यादेवी होळकर उत्सव समिती आणि धनगर कर्मचारी अधिकारी संघटना वरोरा यांच्या संयुक्त विद्यमाने सेवानिवृत्त सहाय्यक शिक्षक संजय बोधे यांच्या सेवापूर्ती सोहळ्याचे आयोजन शनिवार १ नोव्हेंबर रोजी जीवक वाचनालय, मातोश्री परिसर, बोर्डा येथे करण्यात आले होते. यावेळी त्यांच्या कार्याचा गौरव करित त्यांना पुढील वाटचालीच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

.          या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धनगर समाज महासंघ महाराष्ट्र चे विभागीय अध्यक्ष वासुदेव ऑस्कर, हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून धनगर महासंघ चंद्रपूरचे अध्यक्ष रमेश बूच्ये, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापिठ वामन तुर्के, राजमाता अहिल्यादेवी होळकर प्रबोधिनी मंच चंद्रपूर जिल्हाचे अध्यक्ष कैलास उराडे, धनगर कर्मचारी अधिकारी संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष विलास डाखोरे, आणि धनगर कर्मचारी अधिकारी संघटना सचिव रामचंद्र चुकांबे उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी आपल्या भाषणातून त्यांच्या कार्याचा गौरव केला.

.            या कार्यक्रमाचे नियोजन अत्यंत सुयोग्य पद्धतीने करण्यात आले होते. मान्यवरांच्या हस्ते संजय बोधे यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी धनगर कर्मचारी अधिकारी संघटना वरोरा तालुक्याचे अध्यक्ष कमलाकर पडवे, सचिव महेश लोंढे, कोषाध्यक्ष संजय काळे तसेच अहिल्यादेवी होळकर उत्सव समितीचे अध्यक्ष शिरीष उगे, संघटक गणेश चिडे, आकाश ढवळे, राकेश टापरे, श्रीकांत चिडे, आशिष झाडे, सचिन भोयर, भूषण जिले, अजिंक्य काळे, आशिष मोंढे यांच्यासह कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.

.         कार्यक्रमाचे संचालन कमलाकर पडवे यांनी केले. प्रस्तावना संजय काळे यांनी सादर केली तर आभार प्रदर्शन गणेश चिडे यांनी करून सर्व मान्यवर आणि उपस्थितांचे आभार मानले.

error: Content is protected !!