महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने उपयुक्त पाऊल
कुचना : आदिशक्ती अभियान ग्रामस्तरीय समिती, ग्रामपंचायत कुचना यांचे वतीने किशोरवयीन मुलींसाठी आरोग्य विषयक मार्गदर्शन व किशोरी सभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मुलींना मासिक पाळी संबंधी मार्गदर्शन व जाणीव जागृती करून त्यांच्यातील समज, गैरसमज दूर करण्यात आले.
. या कार्यक्रमास समुपदेशक म्हणून आश्लेषा जीवतोडे भोयर उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत कुचना च्या सरपंच सुचिता ताजणे तर प्रमुख पाहुणे म्हणून समितीच्या अध्यक्षा आशा ताजणे, पोलीस पाटील योगिता बंड, आशा स्वयंसेविका आम्रपाली वैद्य, शारदा चट्टे, बंडू घाटे, पिंपळकर आदी मान्यवर उपस्थित होते.
. यावेळी गावातील किशोरी मुली सोबत शाळेतील विद्यार्थिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या.


