सामाजिक उपक्रमांद्वारे मदतीचा संकल्प
शेतकऱ्यांच्या मदतीसाठी रवींद्र शिंदे यांचा वाढदिवस न साजरा करण्याचा निर्णय
भद्रावती : राज्यातील अतिवृष्टी व पुरस्थितीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असताना आनंदोत्सव साजरा करणे समाजहिताला साजेसे नाही, या संवेदनशील भावनेतून स्व. श्रीनिवासराव शिंदे मेमोरियल रवींद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट, चंद्रपूरचे संस्थापक अध्यक्ष रवींद्र शिंदे यांनी यावर्षी आपला वाढदिवस न साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.
. या निर्णयानिमित्त ट्रस्टच्या माध्यमातून विविध सामाजिक, शैक्षणिक आणि लोकहितकारी उपक्रम राबविण्यात येणार आहेत. ग्रामीण भागातील शिक्षण, आरोग्य, कायदेशीर सक्षमीकरण आणि सामाजिक बांधिलकी यावर भर दिला जाणार आहे.
. ट्रस्टतर्फे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अभ्यासिका योजना-ग्रामीण विद्यार्थ्यांना मोफत अभ्यास साहित्य व वाचनालय सुविधा, सदुरू श्री संत जगनाथ महाराज जनजागृती कार्यक्रम-समाजात नैतिकतेचा आणि ऐक्याचा संदेश. डॉ. बाबासाहेब आंबेडकर कायदे मार्गदर्शन उपक्रम वंचित घटकांना न्यायिक माहिती व सहाय्य. श्रद्धेय बाबा आमटे आरोग्य अभियान-ग्रामीण भागात मोफत आरोग्य तपासणी व औषध वितरण. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे दिव्यांग योजना-दिव्यांग व्यक्तींना सहाय्यक उपकरणांचे वाटप. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम विद्यार्थी कल्याण योजना-विद्यार्थ्यांना शैक्षणिक मार्गदर्शन व करिअर सल्ला. अनाथांची माई स्व. सिंधुताई सपकाळ शैक्षणिक पाल्य योजना-अनाथ बालकांना शैक्षणिक मदत. कै. म. ना. पावडे क्रीडा स्पर्धा-ग्रामीण तरुणांना खेळाद्वारे प्रोत्साहन. तसेच, सहकारी संस्थांच्या अडचणी समजून घेऊन त्यांचे निराकरण करण्याचे प्रयत्न करण्यात येतील.
. या सर्व योजनांचा शुभारंभ १३ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी १० वाजता श्री मंगल कार्यालय, भद्रावती येथे होणार असून विविध क्षेत्रांतील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांची उपस्थिती राहणार आहे.
. या उपक्रमात स्व. श्रीनिवासराव शिंदे मेमोरियल ट्रस्टचे अध्यक्ष, प्रा. धनराज आस्वले, कृषी उत्पन्न बाजार समिती, भद्रावती चे सभापती राजेंद्र डोंगे तसेच रवींद्र शिंदे मित्र परिवार आणि सेवाभावी संस्था, भद्रावती-चंद्रपूर यांचा सक्रिय सहभाग राहणार आहे.
सध्या शेतकऱ्यांच्या दुःखावर फुंकर घालण्याची वेळ आहे, उत्सव साजरा करण्याची नव्हे,” “समाजाप्रती असलेली जबाबदारी ओळखून त्यांच्या अडचणी कमी करण्यासाठी कृती करणे हीच खरी सेवा आहे. त्यामुळे मी वाढदिवसाचा दिवस समाजोपयोगी कार्यासाठी अर्पण केला आहे.”
रविंद्र शिंदे, अध्यक्ष, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सह. बँक, चंद्रपूर


