Home सामाजिक रंगीबेरंगी आकाशदिव्यांनी उजळले आनंद निकेतन महाविद्यालय

रंगीबेरंगी आकाशदिव्यांनी उजळले आनंद निकेतन महाविद्यालय

566

विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला वाव देणारा आगळावेगळा उपक्रम

वरोरा : आनंद निकेतन महाविद्यालय, आनंदवन वरोरा येथे दीपावली सणाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला वाव देणारा “कागदापासून आकाशकंदील निर्मिती” हा आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आला.

.      महाविद्यालयात शैक्षणिक कार्यक्रमांसोबतच विद्यार्थ्यांमधील प्रोत्साहन विविध सुप्त कलागुणांना देण्यासाठी नेहमीच स्पर्धा आणि उपक्रम आयोजित केले जातात. यंदा दीपावलीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी स्वतःच्या कल्पकतेने तयार केलेले रंगीबेरंगी, आकर्षक आकाशदिवे सादर केले.

.        या उपक्रमात १५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विविध रंग, आकार आणि साहित्य वापरून त्यांनी आपापल्या कल्पकतेने सुंदर कंदील साकारले. संपूर्ण महाविद्यालय या कलाकृतींनी उजळून निघाले.

.      उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी सांस्कृतिक विभागाच्या डॉ. दीप्ती चिटणीस आणि प्रा. किरण लांजेवार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच प्राचार्य डॉ. मृणाल काळे आणि उपप्राचार्य राधा सवाने यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. सर्व शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे उपक्रमासाठी मोलाचे सहकार्य मिळाले.

error: Content is protected !!