Home सामाजिक खेमजई येथे रेशीम उद्योग प्रशिक्षण

खेमजई येथे रेशीम उद्योग प्रशिक्षण

570

वरोरा : रेशीम शेती हा शेतीस पूरक, कमी खर्चाचा आणि अधिक उत्पन्न देणारा व्यवसाय असून, तरुण शेतकऱ्यांनी तो स्वीकारावा, असे आवाहन मंडळ कृषी अधिकारी विजय काळे यांनी केले.

.      वरोरा तालुक्यातील खेमजई येथे बँक ऑफ इंडिया स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था (आरसेटी) चंद्रपूर आणि ओज बहुउद्देशीय संस्था वरोरा यांच्या संयुक्त विद्यमाने दहा दिवसीय रेशीम उद्योग प्रशिक्षण संपन्न झाले.

.      या प्रशिक्षणाचे उद्घाटन ओज संस्थेचे संचालक यशवंत सायरे यांच्या अध्यक्षतेखाली झाले. मार्गदर्शनात पी. बी. चौगुले, गजानन हटवार, सुनिता भोगेकर, प्रफुल आडकीने आदींचा सहभाग होता. खेमजई, शेगाव, सालोरी, वायगाव, उमरी, अर्जुनी, गुडगाव येथील ३० तरुण शेतकऱ्यांनी प्रशिक्षण पूर्ण केले. प्रशिक्षणादरम्यान रेशीम प्रगतिशील शेतकरी विजय क्षीरसागर यांच्या प्रकल्पाला भेट देण्यात आली.

.      प्रशिक्षणात रेशीम उत्पादन तंत्र, बाजारपेठ नियोजन, कौशल्यविकास व व्यक्तिमत्त्व विकासावर भर देण्यात आला. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ओज संस्थेचे कार्यकर्ते रमेश चौधरी, स्वप्निल कापटे, आशिष रोकडे आदींनी परिश्रम घेतले.

error: Content is protected !!