वरोरा : तालुक्यातील भटाळा येथे हेल्पेज इंडिया, वरलक्ष्मी फॉउंडेशन, ओज बहुउद्देशीय संस्था वरोरा व वेद संस्था शेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले.
. या शिबिराचे उद्घाटन ग्रामपंचायत भटाळाचे उपसरपंच हरीश जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून भटाळा येथील माजी पंचायत समिती सदस्या वंदना दाते, माजी सरपंच संभाजी बावणे, पपीता सोनुने, सुकेशनी बावणे, ओज संस्थेचे समन्वयक रमेश चौधरी, वेद संस्था संचालक विलास माटे, हेल्पेज इंडिया सामाजिक टीम संरक्षण अधिकारी राशेदा शेख, डॉ. राहिल शेख, इत्यादी उपस्थित होते. राशेदा शेख यांनी आरोग्याबाबत काय काळजी घ्यायची या बाबत वृद्धा सोबत हितगुज साधले व आरोग्य बाबत समस्या जाणून घेतल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रमेश चौधरी यांनी केले.
. हेल्पेज इंडिया व वरलक्ष्मी फाउंडेशन वरोरा द्वारा गावातील 180 वृद्ध व्यक्तीची आरोग्य तपासणी करून उपचार करण्यात आले. या शिबिरात बी. पी., शुगर, सर्दी, ताप, खोकला इत्यादी आजारावर उपचार करण्यात आले. याकरिता डॉक्टर राहिल शेख व राशेदा शेख, फार्मासिस्ट वैभव देठे व संदीप काळे मोलाचे योगदान दिले.
. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गावातील महीला गटांनी, आशा वर्कर, सुकेशनी बावणे व पपीता सोनुने, कविता गौरकार, मंगेश तुमसरे, मारोती बावणे इत्यादीनी सहकार्य केले.


