Home सामाजिक ए. ए. समूह गवराळा समूहाचा वर्धापन दिन संपन्न 

ए. ए. समूह गवराळा समूहाचा वर्धापन दिन संपन्न

576

भद्रावती : मद्यप्राश एक आजार, अश्या चक्रव्युहात अडकलेल्या अनेक मद्यपिना दारू पासून मुक्त करून त्यांना कौटुंबिक, सामाजिक प्रवाहात आणण्यात मोलाची भूमिका पार पाडणाऱ्या ए. ए समूह गवराळा चा ७ वा वर्धापन दिवस दिनांक.५ रोज रविवारला वार्डातील राजमनी हॉल मध्ये संपन्न झाला.

.       या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सामाजिक कार्यकर्ते व दैनिक नवराष्ट्र निर्माण चे प्रतिनिधी पत्रकार लिमेश माणूसमारे प्रमुख अतिथी डॉ. विवेक शिंदे, ग्रामशिक्षण समिती अध्यक्ष दिपक पोटे, संतोष.जी.आदी उपस्थित होते.

कोणतीही मानवी शक्ती आम्हास या आजारातून बरे करणार नाही आमचा दृढसंकल्प व आध्यात्मिक शक्ती आम्हास या व्यसनातून मुक्त करू शकते. अशी प्रतिक्रिया उपस्थित सदस्यांनी व्यक्त केली.

.       लहान लहान गोष्टीत आनंद शोधा म्हणजे तुम्हचे जीवन आनंदित होईल असा संदेश डॉ. विवेक शिंदे यांनी दिला तर अध्यक्षीय मनोगतातून लिमेश माणूसमारे यांनी अत्याधिक व्यसनाधिनते करिता सरकारचे मद्यनिर्मित धोरण व दारूचा प्रचार व प्रसार तद्वतच मद्यनिर्मिती व विक्रीतून मिळणारा महसूल कारणीभूत असल्याचे स्पष्ट केले.

.      दारूचे दुष्परिणाम, व त्यामुळे संसार उध्वस्त होत असेल तर निव्वळ सामाजिक सुधारणा व आदर्श सुविचार सांगण्यापेक्षा दारू उत्पादन बंद करून सरकारने रामराज्याची संकल्पना अंगिकारावी व महसूली तूट अन्य साधनातून वाढवावी असे वास्तववादी विचार मांडले.

.       या कार्यशाळेकरिता महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातून समूहाचे सदस्य उपस्थित होते.व्यसनाधिनतेमुळे आम्हचा भूतकाळ किती भयावह व अस्थिर होता याचे वास्तव वादी अनुभव सदस्यांनी कथन केले. कार्यक्रमाचे संचालन अरुण ए. तर आभार प्रदर्शन अनिल डी. यांनी केले.

error: Content is protected !!