शिवसेना उबाठा गट व शहर भाजपा तर्फे मंडळांचा सत्कार
आगामी नगर परिषद निवडणुकीची रंगीत तालीम
केंद्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांची विशेष उपस्थिती
भद्रावती : शहरात नवरात्र उत्सवाची नऊ दिवस धूम होती. आदिशक्ती व स्त्री शक्तीचा जयजयकार करीत दिनांक. ४ ऑक्टोबर रोजी शहरातील देवींचे कायदा व सुव्यवस्था अबाधित राखून विसर्जन करण्यात आले. दिमाखदार देखावे, आकर्षक वेशभूषा, डीजेच्या तालावर शिस्तबद्ध लेझीम, गरबा नृत्य भद्रावती कराना मेजवानी होती.
. याप्रसंगी शहरात शिवसेना उबाठा गटातर्फे जिल्हाप्रमुख भास्कर ताजने यांच्या नेतृत्वाखाली तालुका प्रमुख नंदू पढाल, शहर प्रमुख घनश्याम आस्वले, माजी कामगार जिल्हा प्रमुख सुयोग भोयर, सुनील पडोळे व शिवसेना समर्थक यांचे उपस्थितीत, तर गांधी चौक इथे शहर भाजपा तसेच गवराळा वॉर्ड इथे श्रीराम जन्मोत्सव समितीच्या वतीने विविध मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.
. महिलांचा उत्साह आनंद वाढविण्याकरिता याप्रसंगी केंद्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष तथा माजी खासदार हंसराज भैय्या अहिर प्रामुख्याने उपस्थित होते.
. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष अनिल धानोरकर, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित, चंद्रपूर चे अध्यक्ष रविंद्र शिंदे, शहर अध्यक्ष सुनील नामोजवार, प्रशांत डाखरे, प्रवीण सातपुते, विनोद पांढरे, आदी सह मधुकर सावनकर, सुदर्शन डोये, रवी तुरारे, बबलू सय्यद, अमर सावनकर तथा भाजपचे शहर पदाधिकारी व समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
. हंसराज अहिर यांचेशी बातचीत केली असता त्यांनी शुभेच्छा देत स्त्री शक्तीचा सन्मान हि पक्षाची प्राथमिकता असल्याचे आवर्जून सांगितले.
. अतिशय वातावरणात विसर्जनातून राजकीय पक्षांनी आपले शक्ती प्रदर्शन केले. आगामी नगर परिषद काबीज करण्याकडे भाजप सह अन्य पक्षांची घौडदौड सुरू असल्याचा प्रत्यय भद्रावतीकराना येत होता हे विशेष.


