खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या हस्ते उद्घाटन
वरोरा : वरोरा तालुक्यातील माढेळी येथे वणा नागरीक सहकारी बँक लि. हिंगणघाटच्या नव्या शाखेचा लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या नवीन शाखेचे उद्घाटन चंद्रपूर लोकसभा क्षेत्राच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या हस्ते करण्यात आले.
![]()
. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वरोरा विधानसभा क्षेत्राचे आमदार करण देवतळे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून हिंगणघाट-समुद्रपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार समीर कुणावार, माजी राज्यमंत्री रणजीत कांबळे, हिंगणघाटचे माजी आमदार राजू तिमांडे, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष रवींद्र शिंदे, जिल्हा परिषद चंद्रपूरचे माजी बांधकाम सभापती प्रकाश मुथा, माढेळी ग्रामपंचायत सरपंच देवानंद महाजन, भद्रावती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजेंद्र डोगे, वरोरा कृषी उत्पन्न बाजार समिती संचालिका कल्पना टोंगे, भद्रावती नगर परिषद माजी उपाध्यक्ष संतोष आमणे, भद्रावती तालुका नागरी सहकारी संस्थेचे संचालक संजय उमरे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.


