नफिस अहमद हनफी यांचा जीवनप्रवास हा मेहनत, चिकाटी आणि कलात्मकतेने सजलेला आहे. वडील ऑर्डनन्स फॅक्टरीत कार्यरत असलेल्या वातावरणात त्यांचे बालपण गेले. त्यांना लहानपणापासूनच नृत्याची आवड होती आणि हीच आवड त्यांना तालुका पातळीपासून राष्ट्रीय पातळीपर्यंत घेऊन गेली. त्यांनी अनेक स्पर्धांमध्ये विजेतेपद मिळवले आणि “भद्रावती भूषण” पुरस्काराने कला क्षेत्रात आपले नाव कोरले.
. स्वखर्चासाठी त्यांनी भद्रावती बाजार समितीत काम केले आणि जीवनातील वास्तव अनुभव घेतले. त्यानंतर व्यवसाय क्षेत्रात पाऊल ठेवून स्क्रीन प्रिंटिंगपासून आपली ओळख निर्माण केली. परंतु त्यांचे मन संगणकाच्या दुनियेत रमत होते.
. सन 2003 पासून त्यांनी संगणक प्रशिक्षक म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. 23 वेगवेगळे कोर्सेस शिकविण्याचे सामर्थ्य त्यांच्या कडे आहे. टॅली, एक्सेल, बँकिंग, प्रोग्रामिंग, डिझायनिंग यांसारख्या कोर्सेससाठी ते विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय झाले.
. आज ते एमकेसिएल अंतर्गत चंद्रपूर जिल्ह्याचे मास्टर ट्रेनर म्हणून कार्यरत आहेत. आधुनिक तंत्रज्ञानातील प्रगतीची जाण ठेवत त्यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) या क्षेत्रातही विशेष नैपुण्य मिळवले आहे.
. भद्रावतीसारख्या छोट्या शहरातून पुण्यासारख्या महानगरापर्यंत त्यांचा प्रवास झाला. नफिस अहमद हनफी यांचे जीवन हे आजच्या तरुणांसाठी एक प्रेरणादायी उदाहरण आहे – “मेहनत आणि शिकण्याची ओढ असेल तर कोणतेही लक्ष्य गाठणे शक्य आहे.”


