बल्लारपूर : तालुक्यातील विसापूर येथील शेतावर जाणाऱ्या पाणंद रस्ते समस्या बिकट झाली आहे. अलीकडेच शेतकऱ्यांनी ही समस्या आमदार सुधीर मुनगंटीवार, खासदार प्रतिभा धानोरकर, जिल्हा व तालुका प्रशासनाकडे मांडली. या रस्त्यांचे सिमांकन करून मोजण्यासाठी बल्लारपूर येथील तहसीलदार रेणुका कोकाटे यांनी शेतशिवारात येत पाणंद रस्ते मोजणी प्रक्रिया सुरु केली.
. बल्लारपूर तालुक्यातील विसापूर गावाच्या हद्दीत ८ पाणंद रस्ते निर्धारित करण्यात आले आहे. आजघडीला सदर रस्ते शेतकऱ्यांसाठी शेतामध्ये पेरणी, आंतरमशागत, कापणी, मळणी आदी कामे करण्यासाठी अडचणीत आणून देणारे आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. या अनुषंगाने तहसिलदार रेणुका कोकाटे आनफिल्ड शेतशिवारात आल्या.त्यांनी पाणंद रस्ते मोजणी करून रस्त्यांचे सिमांकन करण्याचे निर्देश भूमिअभिलेख कार्यालयाला दिले.
. यावेळी तहसिलदार रेणुका कोकाटे, भूमिअभिलेख उपअधिक्षक अनील देशमुख, मंडळ अधिकारी किशोर नवले, महसूल अधिकारी दिपक वढुले,ग्राम महसूल अधिकारी आरती दुलत, विसापूरच्या सरपंच वर्षा कुळमेथे, उपसरपंच अनेकश्वर मेश्राम यांना व शेतकऱ्यांच्या समक्ष वसंत गिरडकर ते बाळा टोंगे व ग्रामपंचायत शेत ते नदी घाट आणि कौशल्या तडस ते दिनकर वडस्कर यांच्या शेतादरम्यान मोजणी करण्याच्या प्रक्रियेला प्रारंभ केला. गावातील सर्वच पाणंद रस्त्यांची मोजणी करून सिमांकन करून देण्याचे त्यांनी शेतकऱ्यांना आश्वासन दिले.


