Home सामाजिक संस्कारांमध्ये कुटुंबाबरोबरच बाहेरील संस्थांची भूमिका महत्त्वपूर्ण आणि यात राष्ट्रीय सेवा योजना अग्रस्थानी

संस्कारांमध्ये कुटुंबाबरोबरच बाहेरील संस्थांची भूमिका महत्त्वपूर्ण आणि यात राष्ट्रीय सेवा योजना अग्रस्थानी

618

प्राचार्य डोंगरे व प्रा. नानोटकर यांचे प्रतिपादन

वरोरा : “संस्कारामध्ये कुटुंबाबरोबरच बाहेरील संस्थांची भूमिका महत्त्वाची आहे व यात राष्ट्रीय सेवा योजनेची भूमिका अग्रस्थानी आहे” व सुरुवातीच्या काळातील राष्ट्रीय सेवा योजनेची भूमिका लोकशिक्षण संस्था वरोरा चे माजी उपाध्यक्ष, प्राचार्य अनिल डोंगरे यांनी विचार लोकमान्य महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजना सप्ताहात मांडले.

.       “राष्ट्रीय सेवा योजना उपक्रमातून स्वयंशिस्त व स्वावलंबन गुण स्वयंसेवकांमध्ये येते, शिक्षण आणि संस्कारामध्येे असलेला फरक, ग्रामीण जीवनातील समस्या व स्वयंसेवकांची भूमिका, प्रत्येकाने जीवनात काय करणे अपेक्षित आहे, सामाजिक दायित्व अशा विविध बाबी उदाहरण देऊन स्वयंसेवकांना सांगितल्या व शिस्तीबद्दल स्वयंसेवकांचे कौतुक करावे असे प्रतिपादन प्रा. अनिल नानोटकर केले.

.       लोक शिक्षण संस्था, वरोरा, द्वारा संचालित, लोकमान्य महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजना सप्ताह 22 सप्टेंबर ते 29 सप्टेंबर 2025 पर्यंत साजरा करण्यात येत आहे. यात राष्ट्रीय सेवा योजना दिन आयोजित करण्यात आला. दरवर्षी २४ सप्टेंबर हा दिवस राष्ट्रीय सेवा योजना दिवस म्हणून साजरा केला जातो. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. जयश्री शास्त्री होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणून लोकशिक्षण संस्था वरोरा चे माजी उपाध्यक्ष, प्राचार्य अनिल डोंगरे व लोकमान्य कनिष्ठ महाविद्यालय, वरोरा चे अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा.अनिल नानोटकर उपस्थित होते.

.      या कार्यक्रमाच्या अध्यक्षा, प्रभारी प्राचार्य डॉ. जयश्री शास्त्री यांनी अध्यक्षीय समारोपातून राष्ट्रीय सेवा योजना उपक्रमामार्फत स्वयंसेवकांना स्वयंशिस्त, समाजसेवा, राष्ट्रीय एकात्मता, मूल्यशिक्षण, सामाजिक बांधिलकी अशा कौशल्यात्मक बाबी मिळतात. यावर मत मांडले व सर्व स्वयंसेवकांचे कौतुक केले.

.     कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन, स्तवन, गोडवाना विद्यापीठ गीताने झाली तर शेवट खरा तो एकची धर्म या प्रार्थनेने झाला.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना सहकार्यक्रम अधिकारी डॉ. श्रीकांत पुरी, प्रस्ताविक राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. रवींद्र शेंडे यांनी केले. तर आभार प्रा.रजनीगंधा खिरटकर यांनी मानले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांचे व माजी स्वयंसेवकांचे खुप मोलाचे सहकार्य मिळाले.

error: Content is protected !!