पक्षाचा विचार प्रत्येक घरी पोहोचवून समाजहितासाठी काम करा – आ. किशोर जोरगेवार
घुगूस : आजचा कार्यक्रम हा फक्त प्रवेशाचा किंवा औपचारिक कार्यक्रमाचा क्षण नाही, तर समाजहितासाठी नवे वचन देण्याचा क्षण आहे. भारतीय जनता पक्षात प्रवेश करून तुम्ही राष्ट्रसेवेच्या एका महान प्रवासाची सुरुवात केली आहे. भाजप हा केवळ सत्तेसाठीचा पक्ष नाही, तो समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचविणारा पक्ष आहे. सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास ही घोषणा म्हणजेच आपली विचारधारा आहे. या विचारधारेचा प्रसार प्रत्येक घरापर्यंत करणे ही आपली जबाबदारी असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.
. शनिवार दिनांक 30 ऑगस्टला पक्ष प्रवेश आणि भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांचा सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी काँग्रेस नेते प्रा. हेमंत उरकुडे यांच्यासह अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. सोबतच सय्यद इद्रीस, नीतू जायसवाल, सविता गोहणे, मनीषा मेश्राम, उज्वला उईके, रमन तांद्रा, गुरुदास तंग्रपवार, मल्लेश बल्ला,किशोर धनकमा व शेकडो काँग्रेस कार्यकर्त्यांनी आ. किशोर जोरगेवार यांच्या समक्ष पक्ष प्रवेश केला.
. याप्रसंगी भाजपचे शहर अध्यक्ष संजय तिवारी, आशिष मासिरकर, साजन गोहणे, पूजा दुर्गम, अनिल बाम, श्याम आगदारी, संतोष नुने, राजकुमार गोडसेलवार, राजश्री राजूरकर, सविता घिवे, सुनीता पाटील, सुनीता घिवे व भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.


