नवी दिल्ली : ओबीसीच्या विविध न्याय हक्काच्या मागण्यासाठी अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष खासदार मल्लिकार्जुन खरगे, विरोधी पक्ष नेते राहुल गांधी, अखिल भारतीय ओबीसी काँग्रेसचे अध्यक्ष डॉ.अनिल जयहिंद, महाराष्ट्र ओबीसी काँग्रेसचे अध्यक्ष भानुदास माळी यांच्या नेतृत्वाखाली दिनांक २५ जुलै २०२५ रोजी तल कटोरा स्टेडियम, दिल्ली येथे काँग्रेस पक्षाच्या ओबीसी विभागाच्या वतीने देशपातळीवर महासंमेलन आयोजित केल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष वसंत मुंडे यांनी दिली.
. मनमोहन सिंग सरकारच्या काळात २०१४ मध्ये जातीनिहाय जनगणना – आर्थिक स्थिती, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, स्त्री पुरुष मुले वारस कुटुंबाची रोजगार, स्वतःचे घर किंवा किरायाचे घर, नोंदी, वाहने, उत्पन्नाचे माध्यम, कुटुंबाची मालमत्ता इत्यादी प्रक्रिया राबवून – जनगणना केली. पण आरएसएस च्या विचारांच्या भाजप सरकारने त्रुटी काढून २३ सप्टेंबर २०२१ रोजी सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दिले. त्यामध्ये मोदी सरकारने जातीय जनगणना करणार नाही, अशी शपथपत्राद्वारे माहिती सर्वोच्च न्यायालयाला दिल्यामुळे आजतागायत जातिनिहाय जनगणना होऊ शकलेली नाही.
. दलित, वंचित, आदिवासी, ओबीसीवर खूप मोठ्या प्रमाणावर अन्याय झालेला आहे. काँग्रेस पक्षाच्या वतीने अनेक वेळा सरकारला तेलंगणा राज्याचे ७४ निकषांचे जातनिहाय जनगणनेसाठी मॉडेल वापरण्याची विनंती केली. परंतु अहंकारी सरकारला देशातील सर्वच आरक्षण संपवायचे आहे. त्यामुळे तेलंगाना पॅटर्न अहंकारी केंद्र सरकारने राबवण्यास नकार दिला.
. विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी जातिनिहाय जनगणना झालीच पाहिजे व शेतकऱ्यांच्या तरुण युवक युवती च्या रोजगारासाठी सामान्य जनतेच्या महागाईच्या संदर्भात यासाठी देशभर पदयात्रा काढून जनजागरण करून दबाव तंत्राचा वापर केल्यामुळे सरकारला काँग्रेस पक्षाच्या नेत्यांमुळे झुकावे लागले. म्हणून मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, के. राजू, डॉ. अनिल जयहिंद, भानुदास माळी यांच्या नेतृत्वाखाली दिल्ली येथे काँग्रेसच्या वतीने ओबीसी विभागाचे ऐतिहासिक महासंमेलन आयोजित केल्याची माहिती ओबीसी काँग्रेसचे नेते वसंत मुंडे यांनी दिली.


