Home सामाजिक विद्यार्थ्यांकडून शेतकऱ्यांना बीज प्रक्रियेचे मार्गदर्शन

विद्यार्थ्यांकडून शेतकऱ्यांना बीज प्रक्रियेचे मार्गदर्शन

841

आरएडब्ल्यूई उपक्रमांतर्गत आनंद निकेतन कृषी महाविद्यालयाचे विद्यार्थी आसाळा गावात दाखल

वरोरा : खरीप हंगामाची तयारी सुरू असतानाच आनंद निकेतन कृषी महाविद्यालय, वरोरा येथील सातव्या सत्रातील विद्यार्थ्यांनी ग्रामीण कृषी कार्यानुभव आणि कृषी औद्योगिक प्रशिक्षण (RAWE) उपक्रमांतर्गत आसाळा गावात शेतकऱ्यांना बीज प्रक्रिया आणि खरीप हंगामातील महत्त्वाच्या तंत्रज्ञानाबाबत मार्गदर्शन केले.

.     विद्यार्थ्यांनी सोयाबीनच्या ‘बापना 111’ या जातीच्या 75 किलो बियाण्यांची बीज प्रक्रिया प्रत्यक्ष करून दाखवली. या वेळी गावातील महिला शेतकरी आचल गाढवे, संगीता डुकरे, बेबी डुकरे यांच्यासह भावराव डुकरे, जितेंद्र गाढवे, सुखदेव देवगडे, मधुकर डुकरे, प्रदीप राजनहिरे यांसारखे शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

.     आरएडब्ल्यूई उपक्रमांतर्गत विद्यार्थी ३ महिने गावात वास्तव्यास राहणार असून, शेतीशी संबंधित विविध बाबींचे प्रात्यक्षिकांसह प्रशिक्षण शेतकऱ्यांना देणार आहेत. यामध्ये पिकांचे लागवड तंत्रज्ञान, बीज प्रक्रिया, शेळीपालन, कुक्कुटपालन, पिकांवरील रोगनिवारण यांचा समावेश आहे.

.       गावात दाखल होताच ग्रामस्थांच्या वतीने विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये राज दसोरा, गोपाळ मसलकर, अथर्व महल्ले, साहिल कंदुकवार, वैभव जनबंधू, शिवराज डुकरे, भूषण गानफाडे यांचा समावेश आहे. स्वागत प्रसंगी गावचे उपसरपंच मारुती जांभुळे, करण असुटकर, सईबाई जांभुळे, मारुती मगरे व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.

.        या उपक्रमांतून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शेतीशी संबंधित अनुभव मिळणार असून शेतकऱ्यांनाही नव्या तंत्रज्ञानाची माहिती मिळणार आहे. हा उपक्रम विद्यार्थी व शेतकरी यांच्यातील संवाद वाढवून ज्ञानवृद्धीस हातभार लावणार असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

error: Content is protected !!