भद्रावती : शैक्षणिक दृष्टीने शालांत परीक्षा व मिळविलेले प्रावीण्य भविष्य ठरविण्यात महत्वाची भूमिका बजावत असते. नुकताच 10 वीचा निकाल लागला. यात विशेष प्राविण्य व गुणवत्ता सिद्ध करणाऱ्या सावित्रीच्या लेकींचा सत्कार करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
. स्थानिक गवराळा प्रभागातील चुटकी बहुउद्देशीय विकास संस्थेचे अध्यक्ष लिमेश माणूसमारे व लोकमान्य विद्यालय भद्रावती येथील शिक्षक शरद राजूरकर यांच्या वाढदिवसानिमित्त सत्काराचे आयोजन करण्यात आले होते.
. याप्रसंगी जिल्हा परिषद शाळा भद्रावती ची विद्यार्थिनी वैशाली राहुल बेताल हिने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत ९५.४० टक्के गुण प्राप्त केले. दुर्गेश्वरी विनोद खापणे या मुलीने ९१.४० टक्के तर लोकमान्य विद्यालय भद्रावती येथील विद्यार्थिनी लक्ष्मी सुनिल बदखल हिने ९३ टक्के प्राप्त करून उत्कृष्ट कामगिरी बजावली. जय जगन्नाथ महाराज सेवानिवृत्त मित्र मंडळ गवराळा वॉर्ड तर्फे ज्येष्ठ जगन्नाथ भक्तांच्या उपस्थितीत त्यांचा शाल श्रीफळ, ग्रंथ, देऊन उचित सत्कार करण्यात आला.
. याप्रसंगी पांडूरंग कोयचाडे, बाबा निखाडे, सूर्यभान परचाके, बंडू परचाके, विनोद सावनकर, विनोद खापणे, सुनील बदखल, उप शहर प्रमुख मनीष बूच्चे, मंगेश येरमे, सुनिल आवारी, श्रीराम नवमी उत्सव समिती चे दिपक बदखल अमर सावनकर, संतोष डवरे, मेघा बोधे, नलिनी माणूसमारे, ज्योती आवारी आदी नागरिक उपस्थित होते.


