Home सामाजिक विखुरलेल्या माजी विद्यार्थ्यांचा अठरा वर्षांनंतर स्नेहमिलन सोहळा

विखुरलेल्या माजी विद्यार्थ्यांचा अठरा वर्षांनंतर स्नेहमिलन सोहळा

854

जुन्या आठवणींना उजाळा

नागभीड : तालुक्यातील टीचर्स करियर एज्युकेशन सोसायटी द्वारा संचालित कृषक विद्यालय कोटगांव येथे दि. 17 मे रोजी झालेला स्नेहमिलन सोहळा अर्थातच गुरुजनांचा ऋणनिर्देश व माजी विद्यार्थी स्नेह मेळावा अत्यंत उत्साहात व खेळीमेळीच्या वातावरणात पार पडला. विद्यालयाच्या सन 2006-07 च्या इयत्ता 10 वी च्या विद्यार्थ्यांनी तब्बल 18 वर्षानंतर एकत्र येऊन हा सोहळा घडवून आणला. तब्बल 18 वर्षांचा कालावधी उलटून गेल्यानंतर विखुरलेले सर्व मित्र मैत्रिणी 18 वर्षानंतर एकमेकांना पाहून सर्वजण आनंदाने भारावून गेले.

.      ते म्हणतात ना, ‘एक एक कडी गुंतली की त्याची साखळी तयार होते’ अगदी तशीच एक साखळी या विद्यार्थ्यांनी व्हाट्सअपच्या माध्यमातून गूंफली. यासाठी ज्या शाळेत शिक्षण घेतले, त्याच शाळेतच हा स्नेहमिलन पार पडला. कार्यक्रम स्थळी सकाळीच सर्व नियोजनानुसार विशेष आतुरता होती ती सर्वांना त्या काळी शिकवलेल्या आपल्या गुरुजनांना भेटण्याची जे आमंत्रित होते. त्यांच्या आगमनाने विद्यार्थ्यांना त्या काळात गेल्याचे जणू भास व्हायला लागले होते. सोहळ्या प्रसंगी पहिल्या सत्रात सर्व गुरुजन मंडळी तथा सहायक कर्मचाऱ्यांना शाल व श्रीफळ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. यानंतर विद्यार्थ्यांनी आपला परिचय नव्याने देताना जुन्या आठवणींना आपल्या मनोगतातून उजाळा दिला. पुन्हा एकदा त्याच वर्गखोलित जाऊन बालपणीच्या आठवणी जागवल्या. अनेकांनी तर आपल्या मुला -मुलींना सोबत आणले होते आणि ते चिमुकलेही या विद्यार्थ्यांनाचा सोहळा पाहून भारावून गेले.

.        सर्व उपस्थित गुरुजनांनी याप्रसंगी मार्गदर्शन केले व विद्यार्थ्यांच्या पुढील सुखी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. सर्व माजी विद्यार्थ्यांनी आपापला परिचय करून देत मनोगत व्यक्त केले व शाळेतील किस्से, कहान्यांना उजाळा दिला. दिवसभर गप्पागोष्टी, एकमेकांच्या हितगुजात रमल्यानंतर सोबतच भोजनाचही आस्वाद घेण्यात आला. शेवटी सर्वांनी पुन्हा भेटण्याचा मानसही व्यक्त करत जड मनाने एकमेकांना निरोप दिला. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक पी. पी. पिसे व सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच सर्व माजी विद्यार्थी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

error: Content is protected !!