Home शैक्षणिक दहावीच्या परीक्षेत लोक विद्यालयाची भरारी

दहावीच्या परीक्षेत लोक विद्यालयाची भरारी

1073

ब्रह्मपुरी : दि रुरल एज्युकेशन सोसायटी ब्रह्मपुरी द्वारा संचालित लोक विद्यालय गांगलवाडी शाळेचा निकाल ८३.८३ लागलेला असून निकालामध्ये यावर्षी मुलांनीच बाजी मारलेली आहे. विद्यालयातून उच्चांक गाठलेले तीनही विद्यार्थी हे बरडकिन्ही या गावचे असून एकाच मोहल्यातील विद्यार्थी आहेत.

.      महाराष्ट्र राज्य एसएससी परीक्षा मंडळ यांनी घेतलेल्या या परीक्षेत विद्यालयाचा निकाल 83.83 टक्के लागलेला असून युगल भास्कर दोनाळकर याने 80 टक्के गुण प्राप्त करून प्रथम क्रमांक पटकावलेला आहे. तर अनिरुद्ध नंदकिशोर दोनाडकर याला 79.60 टक्के व खेमन किसन पाकडे याला 79 गुण प्राप्त झालेले आहेत. 70 ते 80 टक्के दरम्यान विद्यालयातून एकूण पाच विद्यार्थी गुणवत्ता प्राप्त असून मुलींमध्ये सलोनी तुलसीदास धोटे व श्रेया दिलीप बगळे यांनी अनुक्रमे 73 टक्के व 70.80 टक्के गुण प्राप्त करून विद्यालयाचे नाव लौकिक केलेले आहे.

.       महाराष्ट्र शासनाने कापीमुक्त अभियान कठोरपणे राबविले असताना देखील या विद्यालयाने घवघवीत यश प्राप्त केलेले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये बुद्धिमत्ता ठासून भरलेली असून मार्गदर्शकांच्या कामगिरीने व विद्यार्थ्यांचे मेहनतीने मिळविलेल्या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक सचिव आर. एस. राऊत व अध्यक्ष विष्णू तोंडरे तथा सक्रिय सदस्य नागमोती, राऊत, बगमारे, समर्थ यांनी विद्यार्थ्यांचे, मार्गदर्शक शिक्षकांचे तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक बुरडे यांचे अभिनंदन केले असून मार्गदर्शक शिक्षकांद्वारे विद्यार्थ्यांचा घरी जाऊन गुणगौरव करण्यात आला व पुढील वाटचालीसाठी अनेकानेक शुभेच्छा देण्यात आल्या.

error: Content is protected !!