काजळसर येथील मामा तलावातील घटना
विधिवत मूर्तीची विश्वशांती विहारात स्थापना
नेरी : चिमूर तालुक्यातील काजळसर येथील मामा तलावात मासेमारी करीत असलेल्या कोळी बांधवाच्या जाळ्यात तथागत गौतम बुद्धाची मूर्ती सापडली. सदर मूर्तीची विधिवत पूजन करून विश्वशांती विहारात स्थापना करण्यात आले. तलावात मूर्ती सापडल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केला जात असून मनोभावाने पूजाअर्चा केली जात आहे.
. काजळसर येथील मामा तलावात काही मच्छिमार बांधव मासेमारी करीत असताना तथागत गौतम बुद्ध यांची मूर्ती जाळाला अडकली. जाळ बाहेर काढताना ऐका वस्त्रात मूर्ती बांधून दिसली. तेव्हा त्यांनी सदर मूर्तीला एका स्वच्छ जागेवर ठेवले आणि परत मासेमारी करू लागले. एवढ्यात काही नागरिक तिथे मासे खरेदी करण्यासाठी तलावात आले असता त्यांना वस्त्रात गुंडाळलेली काय वस्तू आहे. याची तपासणी केली असता त्यांना तथागत गौतम बुद्धाची मूर्ती आढळून आली. त्यांनी तात्काळ मासेमार बांधवांना विचारले असता त्यांनी सदर मूर्तीची आपबीती सांगितली आणि मूर्ती नेण्याचे सांगितले. तेव्हा काही बौद्ध समाज बांधवांनी सदर मूर्ती विहारात आणून दि 13 मे ला विधिवत पूजा अर्चा विश्व शांती विहारात गौतम बुद्ध यांच्या मुर्तीची स्थापना केली.
. सदर मूर्ती स्थापना कार्यक्रमाला बौध्दगया महाबोधी समितीचे अध्यक्ष विलास राऊत नेरी, निलेश कोसे, बौध्द पंच कमेटी काजळसर अध्यक्ष मंगेश पाटील, सचिव माणिकराव सूर्यवंशी, रामदास पाटील, कचरू शेंडे, निकेश खोब्रागडे, अशोक खोब्रागडे, रमेश पाटील, ललिता पाटील, अश्विनी मेश्राम, रजनी खोब्रागडे, प्रदीप खोब्रागडे, हरिदास खोब्रागडे, तसेच गावातील बौध्द उपासक, उपासिका आणि गावकरी उपस्थित होते.


