Home सामाजिक नागभीड येथे शनिवारी भव्य तिरंगा बाईक यात्रेचे आयोजन

नागभीड येथे शनिवारी भव्य तिरंगा बाईक यात्रेचे आयोजन

869

तिरंगा यात्रेतून भारतीय सैन्याच्या शौर्याला करणार सलाम

नागभीड : भारतीय जवानांनी दाखवलेली धैर्यशीलता, रणनीती आणि समर्पण हे प्रत्येक भारतीयांच्या हृदयात अभिमान निर्माण करणारे आहे. सैन्याच्या पराक्रमाचा गौरव वाढविण्यासाठी नागभीड शहरात दि 17 मे रोजी शनिवारी सायंकाळी 4 वाजता भव्य तिरंगा बाईक यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.

.      जगाचा स्वर्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काश्मीर येथील पहलगाम या पर्यटन स्थळी पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला करीत पर्यटकावर गोळीबार केल्याने 26 भारतीय नागरिकांना आपला जिव गमवावा लागला. या भ्याड हल्याच्या उत्तरात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धाडसी व कणखर नेतृत्वात भारतीय सैन्य दलाच्या तिन्ही दलांनी सयुक्तरित्या मोहीम राबवीत ‘ऑपेरेशन सिंदूर’ हे अभियान राबविले यात शेकडो दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला तसेच दहशतवाद्यांची प्रशिक्षण केंद्र उध्वस्त करण्यात आली. पाकिस्तानी सैन्याला सुद्धा धडा शिकविण्यात आला. जवानांच्या पराक्रमाचा गौरव वाढविण्यासाठी चिमूर विधानसभा क्षेत्राचे आ. बंटी भांगडिया यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये दिनांक 17 मे रोज शनिवाराला सायं 4 वाजता जुना बस स्थानक पासून तिरंगा बाईक यात्रेला सुरुवात होईल व राम मंदिर चौक येथे समारोप होणार आहे.

.         सर्व नागरिकांनी एकजुटीने व निपक्षपणे सहभागी व्हावे कारण ही संधी भारतीय सैनिकाप्रती असलेला आदर, एकता आणी राष्ट्रप्रेमाची भावना व्यक्त करायची असल्याने तरुण वर्ग, महिला मंडळे, स्वयंसेवी संस्था, विविध सामाजिक व सांस्कृतिक संस्था, विविध सेवाभावी संस्था यांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले.

.      सदर नियोजन सभेला नागभीड भाजपा तालुकाध्यक्ष संतोष रडके, चिमूर विधानसभा प्रमुख गणेश तर्वेकर, भाजपा नेते संजय गजपुरे, प्रा. डॉ. अमीर धमाणी, स्वामी विवेकानंद पतसंस्थेचे उपाध्यक्ष अजय काबरा, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती अवेश पठाण, माजी बांधकाम सभापती सचिन आकुलवार, भाजपा जिल्हा महामंत्री प्रिया लांबट, भाजपा तालुकाध्यक्ष इंदु आंबोरकर, भाजप कार्यकर्त्या प्रियंका कोरे, माजी नगरसेवक रुपेश गायकवाड, भाजप कार्यकर्ते रमेश ठाकरे, पवन नागरे, हेमंत नन्नावरे, यांच्यासह विविध पदाधिकारी व कार्यकर्ते या यात्रेच्या नियोजन सभेत उपस्थित होते.

error: Content is protected !!