स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रवींद्र शिंदे चॅरीटेबल ट्रस्टचा उपक्रम
भद्रावती : स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रवींद्र शिंदे चॅरीटेबल ट्रस्ट, चंद्रपुर व ओम चैतन्य सतसंग सेवा मंडळ, चैतन्य नगर, भद्रावती यांच्या तर्फे “विदेही सदगुरु श्री संत जगन्नाथ महाराज जनजागृती व प्रबोधन योजना” अंतर्गत स्व. श्रीनिवासराव ऊर्फ बाबासाहेब शिंदे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ स्थानिक चैतन्य नगर (गौतम नगर) येथील नागरीकांच्या मागणीनुसार निःशुल्क बोरवेलचे भूमिपूजन आज (दि.११) ला संपन्न झाले.
. दरम्यान याच सोहळ्यात ट्रस्टचे उपक्रम “हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे दिव्यांग योजना” अंतर्गत माजरी येथील दिव्यांग मंगेश नागोराव लांडगे यांना स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रवींद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट कडून तीनचाकी सायकल भेट देण्यात आली.
. सदर बोरवेलचे भुमीपुजन सोहळ्याला ह.भ.प. केशवानंद मेश्राम महाराज, ट्रस्टचे संस्थापक सदस्य तथा शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे चंद्रपूर जिल्हाप्रमुख रविंद्र शिंदे, ट्रस्टचे अध्यक्ष प्रा. धनराज आस्वले, ट्रस्टच्या कोषाध्यक्ष सुषमा शिंदे, शिवसेना (उबाठा) भद्रावती तालुका प्रमुख नंदू पढाल, शहर प्रमुख घनश्याम आस्वले, युवा सेना जिल्हा प्रमुख रोहन खुटेमाटे, विश्वास कोंगरे, ज्येष्ठ शिवसैनिक तथा उपशहर प्रमुख हनु पारधे, उत्तम मुजुमदार, रुग्णसेवक पंकज कातोरे, ग्राहक मंच चे पुरुषोत्तम मते, माजी नगरसेवक विनोद वानखेडे, सामाजिक कार्यकर्ते संजय उमरे व परिसरातील प्रतिष्ठित नागरिक व नगरवासी उपस्थित होते. यावेळी भक्तिमय वातावरणात भजन, पूजन व प्रार्थना पार पडली. मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.


