Home सामाजिक उन्हाळी शिबीरातील सकारात्मक कृतींमूळे विद्यार्थ्यांत बदल घडून येतो – राजकुमार एकवनकर

उन्हाळी शिबीरातील सकारात्मक कृतींमूळे विद्यार्थ्यांत बदल घडून येतो – राजकुमार एकवनकर

881

बोंड येथील जि.प शाळेतील उन्हाळी शिबीराचे समापन

नागभीड : तालुक्यातील जि.प. उच्च प्राथमिक शाळा, बोंड येथे सहा दिवशीय उन्हाळी शिबीराचे समापन करण्यात आले. सदर शिबीर हे विद्यार्थ्यांच्या सूप्त गुणांना चालना देणे, त्यांच्या चेतकबदल कौशल्यात प्रविणता निर्माण करणे तथा भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्याची ताकद वृद्धिंगत करणे यासाठी घेण्यात आले. या उन्हाळी शिबीरातील विविध कृतियुक्त प्रात्यक्षिकांमूळे विद्यार्थ्यांत सकारात्मक बदल झाल्याचे कार्यक्रम प्रमुख तथा शाळेचे मुख्याध्यापक राजकुमार एकवनकर यांनी समारोपीय कार्यक्रम प्रसंगी विशद केले.

.      सदर शिबीराच्या पहिल्या दिवशी नामदेव सहारे यांनी इंग्रजी संभाषणातील आत्मविश्वास वाढविण्यासाठी विविध प्रात्यक्षिके सादर करुन विद्यार्थ्यांना बोलते केले.इंग्रजी ही जागतिक भाषा आहे, ती प्रत्येकाने बोलली पाहिजे असे त्यांनी सांगितले. दुसऱ्या दिवशी लेकराम डेंगे यांनी आर्टस् ॲन्ड क्राफ्टस् या विषयाशी संबंधित कृतियुक्त पद्धतीने विद्यार्थ्यांकडून विमान, फुल, बदक, जहाज, कुंडी इ. साहित्य करवून घेतले. या कृतींचा विद्यार्थ्यांनी निखळ आनंद घेतला.तिसऱ्या दिवशी प्रदिप मडावी यांनी रंगसंगती, रंगभरण, रंगांचे प्रकार इ. समजावून चित्र काढायला लावले. चौथ्या दिवशी सुरज मेश्राम यांनी एरोबिक्स या प्रकारातील मैदानी नृत्य शिकविले, ज्याचा भरपूर आनंद विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. पाचव्या दिवशी नामदेव सहारे यांनी इंग्रजी संभाषण कौशल्य शिकविले तर सहाव्या दिवशी विनोद लांडगे यांनी अंधश्रद्धा व शालेय शिक्षण या विषयावर विविध प्रयोग सादर करून विद्यार्थ्यांना एका वेगळ्या विश्वात नेण्याची कृती पार पाडली.

.      समारोपीय कार्यक्रमा प्रसंगी विचारमंचावर उपस्थित ॲड. अमर खंडाळे, विनोद लांडगे, नितेश नवघडे यांनी आपले विचार व्यक्त केले. या सर्व घडामोडींना शाळेचे उच्च श्रेणी मुख्याध्यापक राजकुमार एकवनकर,मंगला अनमुलवार स.शी., दिपक उईके स.शि., लीना भुसारी विशि, दुर्वेकांत बनकर विशि यांनी सहकार्य केले.

error: Content is protected !!