Home सामाजिक वरोरा शहरातील विकासकामांना प्रशासनाची मंजुरी

वरोरा शहरातील विकासकामांना प्रशासनाची मंजुरी

901

खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या प्रयत्नांना यश

चंदपूर : वरोरा शहरातील नागरिकांच्या विविध समस्यांवर तातडीने उपाययोजना करण्यासाठी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी जिल्हा प्रशासनाकडे केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी वरोरा शहरातील महत्त्वाच्या समस्या संदर्भात समिती गठीत करून समस्या मार्गी लावण्याचे निर्देश दिले. लवकरच या सरदर्भात अतिरिक्त जिल्हाधिकारी भेट देऊन समस्या मार्गी लावण्याकरिता कार्यवाही करणार आहे. गुरुवारी खासदार धानोरकर यांनी जिल्हाधिकारी विनय गौडा यांची भेट घेऊन वरोरा शहरातील नागरिकांच्या समस्या लक्षात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांना चर्चा केली. या चर्चेत त्यांनी तात्काळ गांधी सागर तलावाचे खोलीकरण, कोराडी नाल्या अंतर्गत वरोरा शहरातील सांडपाण्याचा प्रश्न, कासमपंजा नाल्याच्या पाण्यासाठी पर्यायी व्यवस्था आणि शहराच्या मध्यभागी असलेल्या गांधी तलावाचे नगर परिषदेला हस्तांतरण करून त्याचे सौंदर्यीकरण करण्याची मागणी केली होती.

.       यावेळी वरोरा नगरपरिषद मुख्याधिकारी विशाखा शेळके, गांधीसागर तलाव खोलीकरण समितीचे अध्यक्ष प्रवीण धनवलकर, प्रवीण सुराणा, मनीष जेठाणी यांची उपस्थिती होती.

.      गांधी सागर तलावात मोठ्या प्रमाणात गाळ साठल्याने तलावाचे विद्रुपीकरण झाले आहे. तलावातील गाळ काढल्यास पाण्याच्या नवीन स्रोत निर्माण होऊन त्याचे सौंदर्यीकरण करून नौका विहार सुरु केल्यास छोटे पर्यटन सुरु होईल. या संदर्भात खासदार धानोरकर यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत जिल्हाधिकाऱ्यांनी नाम फाऊंडेशन च्या माध्यमातून गांधी सागर तलावातील गाळ काढण्यासाठी तात्काळ परवानगी दिली. तसेच या तलावाचे सौंदर्यीकरण करण्याच्या संदर्भात आराखडा तात्काळ सादर करण्याचे आदेश मुख्याधिकारी नगर परिषद वरोरा यांना दिले. त्यासोबतच वरोरा येथील सांड पाण्याच्या प्रश्न सोडविण्यासाठी पाहणी करून तात्काळ अहवाल देण्याच्या सूचना देखील जिल्हाधिकारी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. सांडपाण्याच्या प्रश्न मिटल्यास अनेक शेतकऱ्यांना शेती करता येणार आहे. व पिकाचे नुकसान देखील टाळता येणार आहे. जिल्हा प्रशासनाने दिलेल्या सकारात्मक प्रतिसादाने शेतकरी व नागरिकाने आनंद व्यक्त करीत खासदार प्रतिभाताई धानोरकर यांचे आभार मानले आहे.

error: Content is protected !!