चंद्रपूर
. गणेश चतुर्थीला गणपती बाप्पाचे आगमन दहा दिवस मनोभावे पूजा अर्चा केल्यानंतर अनंत चतुर्दशीला गणपती बाप्पाचे तितक्याच मनोभावे विसर्जन केल्या जाते. याचेच औचित्य साधून विठाई बहुउद्देशीय संस्था आणि सामाजिक कार्यकर्ते शिवा कोरेवार यांच्या संयुक्त विद्यमाने सार्वजनिक गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचा शाल,श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
. याप्रसंगी गणेश मंडळांचा जल्लोष बघण्यासारखा होता बाप्पाच्या शेवटच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी ओसंडून वाहत होती. सामाजिक संदेश देणारे विविध देखावे याप्रसंगी बघायला मिळालेत. ढोल ताशाच्या गजरात डीजेच्या तालावर अबाल-वृद्ध तरुणाई बेफाम होऊन नाचत होती. एकंदरीत वातावरण बाप्पामय झालेले होते.
. या कार्यक्रमाप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते शिवा कोरेवार आणि मित्र परिवाराची उपस्थिती होती.सोबत विठाई बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष महेश काहिलकर विठाई परिवारातील पदाधिकारी आणि सदस्यांची उपस्थिती होती.


