शेतामध्ये विद्युत करंट लागून मृत्यू झाला असल्याचा प्राथमिक अंदाज.
शेत मालक अशोक बोरकर आणि मुलगा अजय बोरकर यांना विभागाने घेतले ताब्यात.
सिंदेवाही
. मागील पंधरा दिवसांपासून नागभिड, ब्रम्हपुरी, नंतर सिंदेवाही मध्ये दाखल झालेल्या हत्तीने अनेक शेतकऱ्यांच्या पिकांची नासधूस करीत असताना अचानक सिंदेवाही मधील लोणखैरी येथील कक्ष क्र. २४७ मध्ये मंगळवारी सकाळी चिटकी येथील नागरिकांना हत्ती मृत अवस्थेत आढळून आल्याने गावात एकच खळबळ उडाली. व घटनेची माहिती वनरक्षक राठोड यांना मिळताच त्यांनी आपल्या अधिनिस्त कर्मचाऱ्यांना घेऊन खात्री करण्यात आली.
. वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय सिंदेवाही अंतर्गत उपक्षेत्र सिंदेवाही, नियतक्षेत्र लोणखैरी कक्ष क्रमांक २४७ मध्ये घडली असून सदर घटनेची माहिती वरिष्ठांना कळविण्यात आली. त्यानुसार चंद्रपूर मुख्य वणसंरक्षक जितेंद्र रामगावकर, हे घटनास्थळी दाखल झाले. सदर घटना ही चिटकी येथील अशोक पांडुरंग बोरकर यांचे शेतात घडली असून ब्रम्हपुरी विभागाचे उपवनसंरक्षक दिपेश मलहोत्रा, ब्रम्हपुरीचे सहाय्यक वनसंरक्षक ( प्रादेशिक, वन्यजीव) एम.बी.चोपडे, चंद्रपूरचे पशुवैद्यकीय अधिकारी ( वन्यजीव) डॉ. रविकांत खोब्रागडे, मानद वन्यजीव रक्षक बंडू धोतरे, वन्यजीव चे मुख्य वनसंरक्षक विवेक करंबेकर, सिंदेवाहिचे पशुधन विकास अधिकारी डॉ. विनोद सुरपाम, यांचे उपस्थित हत्तीचे निरीक्षण करून हत्तीचा मृत्यू विद्युत प्रवाहाच्या अपघाताने झाला असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यानुसार अशोक पांडुरंग बोरकर यांचे शेता सभोवतालच्या परिसराचे झडती घेऊन प्रकरणात अशोक पांडुरंग बोरकर, वय ६५ आणि मुलगा अजय अशोक बोरकर वय २९ वर्ष यांचे विरुद्ध पी. ओ.आर. क्र. ०९१३०/ २२८२३१ अन्वये वन गुन्हा नोंदविण्यात आला असून चौकशी साठी दोघानाही ताब्यात घेण्यात आले आहे. आणि आरोपींची सखोल चौकशी सुरू आहे.

