कृषिविभागाने तात्काळ उपाययोजना करावी
सरपंच दिक्षा पाटील यांची मागणी
नेरी
. चिमूर तालुक्यातील नेरी विभागात तसेच अनेक परिसरात मोट्या प्रमाणात धान पिकाचे उत्पादन घेतले जाते या वर्षी धान पीक जोमात असून भरघोस उत्पादन हातात येणार असे असताना शेतकऱ्यांना आनंद झाला होता मात्र ऐन पीक जोमात असताना धान पिकावर लाल्या, करपा, मावा, तुळतुळा रोगांची लागण दिसून येत असून संपूर्ण पीक धोक्यात असल्याची चिन्हे दिसू लागली आहे तेव्हा सदर बाबतीत कृषी विभागाने दक्षता घ्यावी अशी मागणी लोहारा येथील सरपंच दिक्षा पाटील यांनी केली आहे.
. धान पिक ऐन जोमात असताना पिकावर अनेक रोगांचा पादुर्भाव दिसू लागला असून परिसरातील शेतकरी हे पाठीवर रोगप्रतिकारक औषध फवारणी करण्यासाठी पंप घेऊन जाताना दिसतात जो तो फवारणीच्या कामात गुंतलेला दिसतो मात्र पिकावरील रोग कमी होताना दिसत नाही आहे या रोगांमुळे पिके उध्वस्त होण्याच्या मार्गावर असून परत शेतकरी कर्जाच्या खाईत जाण्याची भीती निर्माण झाली आहे तेव्हा कृषी विभागाने या बाबीची दखल घेऊन शेतकऱ्याच्या मदतीला धावून जावे आणि त्यांना योग्य मार्गदर्शन करावे तसेच प्रत्येक गावात जाऊन शेतकऱ्यांना रोगप्रतिकारक औषधी विषयी माहिती द्यावी अशी मागणी सरपंच दिक्षा पाटील यांनी केली आहे.

