Home सामाजिक वरोरा शहरात ईद मिलादुन्नबी उत्साहात

वरोरा शहरात ईद मिलादुन्नबी उत्साहात

811

मिरवणूकीतून दिले जातीय एकतेचे दर्शन

वरोरा

.          पैगंबर-ए-इस्लाम मोहम्मद साहब यांची जयंती जश्न-ए-ईद मिलादुन्नबी च्या निमित्ताने मिरवणुक काढून साजरी करण्यात आली. मिरवणुकीत पैगंबर साहेबांच्या सन्मानार्थ घोषणा देत मिरवणूक काढण्यात आली. विविध सामाजिक संघटनांनी मिरवणुकीचे जल्लोषात स्वागत करून जातीय एकतेचे दर्शन घडवले.

.          ईद मिलादुन्नबी निमित्त शहर कमिटीच्या समन्वयाने प्रत्येक परिसरातून काढण्यात आलेल्या मोहम्मदी मिरवणुकीत मोठ्या संख्येने लोक सहभागी झाले होते. इस्लाम धर्माचे प्रेषित आणि अल्लाह चे प्रिय प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त मुस्लिम समाजाने हजरत ख्वाजा जहरुद्दीन चिश्ती यांच्या दरगाह येथून मिरवणूक शहरातील प्रमुख मार्गांवरून काढली. सकाळी 9 वाजता शहरातील विविध भागातून निघालेली मिरवणूक आंबेडकर चौक येथील हजरत ख्वाजा जहरुद्दीन चिश्ती यांच्या दर्ग्यावर पोहोचली तेथून ही मिरवणूक मेनरोड, सद्भावना चौक, वीर सावरकर चौक, सराफा बाजार, मौलाना आझाद वार्ड, नई बस्ती, हनुमान वॉर्ड, नेहरू चौक मार्गे हजरत ख्वाजा जहरुद्दीन चिश्ती र.अ. यांच्या दर्गा येथे पोहचली मिरवणुकीत सामाजिक समरसतेचा नारा देत एकतेचा आदर्श निर्माण केला. यावेळी वीर सावरकर चौकात शिवसेना (उठाबा) जिल्हाप्रमुख मुकेश जीवतोडे यांनी मिरवणुकीत सहभागी झालेल्यांचे स्वागत व पुष्पहार अर्पण करून सत्कार केला. मिरवणुकीत सहभागी झालेल्या मुलांना चॉकलेट, बिस्किटांचे वाटप करण्यात आले.

.          वरोरा येथील गुरु देव सेवा मंडळाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी सराफा लाईन डोंगरवार चौकात मिरवणुकीत सहभागी धर्मगुरू, ज्येष्ठ नागरिक, सामाजिक कार्यकर्ते व समिती सदस्यांचा गुलाबपुष्प देऊन गौरव केला.

.          बुधवारपासूनच मुस्लीम समाजाच्या लोकांनी परिसरात आकर्षक सजावट केली होती. लोकांनी घरे आणि मशिदी दिव्यांनी सजवल्या. लंगर चे वाटप केले. ठिकठिकाणी झेंडे लावण्यात आले. मुस्लिम समाजातील धर्म गुरू म्हणाले की, पैगंबर मोहम्मद साहेबांनी देश आणि जगाला मानवतेचा संदेश दिला. प्रत्येकाला त्याच्या जीवनातून प्रेरणा मिळते. मिरवणुकीत मोठ्या संख्येने लहान मुले हातात झेंडे घेऊन मिरवणुकीत सहभागी झाली होती. आणि ते घोषणा देत होते. यावेळी खिदमत सोशल फाऊंडेशन चे सय्यद आसिफ रजा, सादिक थैम, नियाज सय्यद, साजिद पठाण, वसीम शेख, शोएब शेख, अन्सार रजा, तन्वीर शेख, सय्यद अबरार, सय्यद रजा, नवाज रजा यांनी मिरवणुकीत सहभागी झालेल्यांना प्रोत्साहन दिले. ठिकठिकाणी लंगर(महाप्रसाद), शरबत व फळांचे वाटप करण्यात आले. मिरवणुकीत पायी जाणाऱ्यांचेही फुलांची उधळण व पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले.

error: Content is protected !!