Home सामाजिक वरोऱ्यात ढोल-ताशा, टाळ, मृदूंग, भजनाने बाप्पाला निरोप

वरोऱ्यात ढोल-ताशा, टाळ, मृदूंग, भजनाने बाप्पाला निरोप

829

वरोरा

.        वरोरातील सार्वजनिक गणेशोत्सवासह घरोघरी विराजमान विघ्नहर्ता गणपती बाप्पाला वाजत -गाजत निरोप देण्यात आला. वरोऱ्यातील पारंपारिक विसर्जन मिरवणूक ढोल -ताशा, टाळ, मृदूंग, भजनी मंडळींच्या उत्साहात काढण्यात आले.

.        गणेश विसर्जन मिरवणूक हा वरोऱ्यातील एक सांस्कृतिक ठेवा बनला आहे. शतकोत्तर परंपरा आजही अबाधित आहे. विसर्जन मिरवणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वरोरा तर्फे विलासराव नेरकर विधानसभा अध्यक्ष वरोरा भद्रावती यांच्या नेतृत्वाखाली स्वागत मंडप उभारण्यात आले होते. प्रत्येक गणेश मंडळांचे तथा भक्तांचे पुष्पगुच्छ, श्रीफळ, श्री गणेशाची प्रतिमा भेट देऊन स्वागत करण्यात येत होते. तसेच विविध सामाजिक संघटना व राजकीय पक्षांचे पदाधिकारी यांचे स्वागत मंडप भेटीदरम्यान त्यांचेसुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वरोरा तर्फे पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन स्वागत करण्यात आले.

.        मिरवणुकीसाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली होती. गणेश विसर्जन मिरवणुकीला सकाळी १० वाजता पासून मानाचा गणपती मोठे विठ्ठल मंदिर गणेश मंडळ पासून प्रारंभ झाला. तर रात्रौ ११ वाजता लहान विठ्ठल मंदिर गणेश मंडळांने मिरवणुकीची सांगता केली. यावेळी अनेक गणेशोत्सव मंडळे मिरवणुकीत सहभागी झाले होते. गणेश विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली.

.        गणपती विसर्जन मिरवणूक शांततेत आणि सुरळीत पार पाडण्यासाठी चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वरोरा चे पदाधिकारी विलास नेरकर, चंद्रकांत कुंभारे, दिनेश मोहारे, गोविंद ठेंगणे, विठ्ठल देवगडे, रवींद्र भोयर, शांताराम लोहकरे, सुनीता नरडे, लता हिवरकर, दिलीप खैरे, रमेश कराडे, प्रभाकर दारव्हणकर, सुर्यकुमार गावंडे, अनिल डाखरे, बंडू खारकर, प्रशांत आसुटकर, रुपेश लभाने, जीवन बावणे, अजय गायकवाड, पंकज पुंजणवार, हर्षल निब्रट, विजय खिरटकर, विजय धनरे, सुधाकर उपरे, अमोल धानोरकर मिरवणूक कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी अथक परिश्रम घेतले होते.

error: Content is protected !!