पाली भिक्षुनिवास बुद्ध विहाराचा अनोखा उपक्रम
अभिनव उपक्रमाला अनेकांचे लाभले सहकार्य
बल्लारपूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त बल्लारपूर येथील पाली भिक्षुनिवास बुद्ध विहार मध्ये अभिनव उपक्रम राबविला.शिक्षणाचे महत्व अधोरेखित करण्यासाठी व समाज बांधवांनी शिक्षणाची कास धरावी,म्हणून बल्लारपूर येथे सलग १८ तासांच्या अभ्यासातून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. या उपक्रमाला समाज बांधवांनी सहकार्य केले. या अनोख्या उपक्रमाचे अनेकांनी भरभरून कौतुक केले.
. बल्लारपूर येथील भिक्षुनिवास पाली बुद्ध विहार मध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती विद्यार्थ्यांनी सलग १८ तास अभ्यास करून अनोख्या पद्धतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले. ही संकल्पना भास्कर भगत यांच्या मार्गदर्शनात प्रणाली भसारकर,जयभारत चौधरी, प्रतिक भगत व सामील डुंबरे यांनी मार्गदर्शन करून या उपक्रमाला सुरवात केली. प्रारंभी तथागत गौतम बुद्ध व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला मालार्पण करून करण्यात आले. तदनंतर सकाळी ६ वाजता पासून रात्री १२ वाजेपर्यंत सलग विद्यार्थ्यांनी अभ्यास केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाचे महत्व अधोरेखित करताना म्हटले होते की, शिक्षण हे वाघिणीचे दुध आहे, ज्यो ते प्राशन करील, तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही, याची प्रचिती देत अनोखा उपक्रम यशस्वी केला.
. या अभिनव उपक्रमाला संपत कोरडे, जयदास भगत, ताराचंद थूल, तुळशीदास खैरे, प्रकाश देवगडे, नरेंद्र जानके, बाळू महेशकर, भास्कर भगत आदींनी सहकार्य केले.


