Home सामाजिक विवेकानंद महाविद्यालयात 17 एप्रिलला पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभ

विवेकानंद महाविद्यालयात 17 एप्रिलला पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभ

966

भद्रावती : स्थानिक विवेकानंद महाविद्यालयात गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली अंतर्गत सत्र 2023 – 24 मधील विद्यार्थ्यांसाठी पदवी प्रमाणपत्र वितरण तथा महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थी पारितोषिक वितरण समारंभाचे आयोजन गुरुवार दि. 17 एप्रिल ला सकाळी 10 वाजता करण्यात आले आहे.

.       या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विवेकानंद ज्ञानपीठ वरोरा चे अध्यक्ष पुरुषोत्तम स्वान राहणार तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून गोंडवाना विद्यापीठातील विज्ञान आणि तंत्रज्ञान शाखेचे अधिष्ठाता डॉ. अनिल चिताडे राहणार आहेत. विवेकानंद ज्ञानपीठ वरोरा चे सचिव अमन टेमुर्डे, आय.एस.बी. बेहरिन रिटर्न सेवानिवृत्त प्रा. धनराज आस्वले यावेळी उपस्थित राहणार आहेत.

.        विवेकानंद महाविद्यालयातील श्री. अरविंद सभागृहात होणाऱ्या या समारंभास महाविद्यालयाचे आजी, माजी, विद्यार्थी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नामदेव उमाटे यांनी केले आहे. या समारंभाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील वरिष्ठ व कनिष्ठ विभागातील सर्व प्राध्यापक तथा शिक्षकेतर कर्मचारी प्रयत्न करीत आहे.

error: Content is protected !!