वरोरा : लोक शिक्षण संस्था वरोडा द्वारा संचालित लोकमान्य महाविद्यालय, वरोरा येथे आज शुक्रवार दि. 14 एप्रिल ला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती साजरी करण्यात आली. महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना व समान संधी केंद्र विभागाच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
. कार्यक्रमासाठी प्रमुख व्याख्याते म्हणून लोकशिक्षण संस्था, वरोरा चे सदस्य अविनाश कांबळे हे होते. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन व कार्य यावर प्रकाश टाकला. तसेच डॉ. आंबेडकरांची सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हणून ओळख,शिका- संघटित व्हा- आणि संघर्ष करा हे तत्व,विद्यार्थ्यांची वर्तमान वाचनाची सवय याअनुषंगाने विचार मांडले.
. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या, डॉ.जयश्री शास्त्री होत्या.त्यांनी दलित साहित्य,आर्थिक विषमता,वर्तमान काळातील आर्थिक विषमता पसरविणारा वारसाहक्क घटक इत्यादी बाबींवर प्रकाश टाकला.
. कार्यक्रमाचे संचालन राष्ट्रीय सेवाा योजना सहकार्यक्रम अधिकारी डॉ. श्रीकांत पुरी यांनी केले. प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय डॉ. श्रीनिवास पिलगुलवार यांनी तर आभार डॉ.रवींद्र शेंडे यांनी केले. कार्यक्रमासाठी विद्यार्थी, महाविद्यालयातील प्राध्यापक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य मिळाले.


