Home सामाजिक विवेकानंद महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

विवेकानंद महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

974

भद्रावती : विवेकानंद महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग व सांस्कृतिक विभाग यांच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

.       या कार्यक्रम प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नामदेव उमाटे व उपप्राचार्य डॉ. सुधीर आस्टुनकर तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. यावेळी संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. ग्रंथालयात सामूहिक ग्रंथ वाचन करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन आणि प्रास्ताविक प्रा. अमोल ठाकरे यांनी केले तर आभार प्रा. खोजराज कापगते यांनी मानले.

error: Content is protected !!