Home सामाजिक विसापूरातील मातोश्री वृद्धाश्रम टाकणार कात

विसापूरातील मातोश्री वृद्धाश्रम टाकणार कात

984

बांधकामासाठी ९ कोटीचा निधी

नवीन बांधकामांचे मान्यवरांनी केले भूमिपूजन

बल्लारपूर : तालुक्यातील चंद्रपूर – बल्लारपूर मार्गावर विसापूर गावाच्या हद्दीत मातोश्री वृद्धाश्रम आहे. या वृद्धाश्रमात आजघडीला ६५ च्या आसपास वृद्धांचे वास्तव्य आहे. आयुष्याची अखेर घालविणाऱ्या वृद्धांना वृद्धाश्रमात सोईसुविधा निर्माण करण्याच्या अनुषंगाने ९ कोटी १७ लाख ८८ हजार रुपये निधी खर्च करून नवीन बांधकाम केले जाणार आहे. याचे भूमिपूजन मातोश्री वृद्धाश्रमात मंगळवार ( दि. ८ ) रोजी मान्यवरांनी केले. आता मातोश्री वृद्धाश्रम नव्याने कात टाकणार असून वृद्धांना सुखमय वातावरण लाभणार आहे.

.     चंद्रपूर येथील भारतीय समाज सेवा संस्थेच्या वतीने मातोश्री वृद्धाश्रम चालविले जात असून या संस्थेच्या सर्वेसर्वा माजी मंत्री शोभाताई फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या भूमिपूजन कार्यक्रमाला संस्थेचे सचिव अजय जयस्वाल, उपाध्यक्ष ॲड. रवि भागवत, रमेश बागला, वसंत धोटे, विश्वस्त डॉ. शरद शालफळे, राजेंद्र संचेती, दत्तात्रय काशीकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मुकेश टांगळे, अभियंता संजोग मेंढे, वैभव जोशी, बल्लारपूर चे गटविकास अधिकारी धनंजय साळवे, नायब तहसिलदार सतीश साळवे, डॉ. रजनी हजारे, विसापूर चे उपसरपंच अनेकश्वर मेश्राम, माजी जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ टोंगे आदी मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती.

error: Content is protected !!