Home सामाजिक जय श्रीराम च्या जयघोषाने नागभीड नगरी दुमदुमली

जय श्रीराम च्या जयघोषाने नागभीड नगरी दुमदुमली

954

शोभायात्रेत घडून आले हिंदू मुस्लिम ऐकतेचे दर्शन

नागभीड : श्रीराम नवमी उत्सव समिती नागभीड च्या वतीने चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार बंटी भांगडिया यांच्या मार्गदर्शनात नागभीड शहारातून रामनवमी निमित्त भव्य शोभा यात्रा काढण्यात आली. यावेळी जय श्रीराम च्या जय घोषणेने नागभीड नगरी दुमदुमून गेली होती.

.       या शोभायात्रेत प्रभू श्रीरामाचे भव्य असे सुशोभीत छायाचित्र, घोड्यावर स्वार पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, छत्रपती शिवाजी महाराज सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. प्रभू श्रीराम, लक्ष्मण, माता सीता यांची रथावर आकर्षक झाकी, नवदुर्गा झाकी, प्रभू श्रीराम यांच्या जन्मावर आधारित झाकी, व इतर झाक्या, आकर्षक लायटिंग, फटाक्यांची आतिषबाजी यामुळे शोभा यात्रेला भव्यता आली. या शोभा यात्रेत हिंदू मुस्लिम एकतेचे दर्शन घडून आले.. नागभीड मुस्लिम समाज व एकता मुस्लिम युवा ग्रुप च्या वतीने शोभा यात्रेत सहभागी राम भक्तांना शरबत चे वितरण करण्यात आले तर विविध ठिकाणी मुस्लिम बांधवाकडून फुलांची उधळण श्रीराम, लक्ष्मण माता सीता यांच्या रथावर करण्यात आली.. स्वामी विवेकानंद पतसंस्थेच्या वतीने रामभक्तांना लाडू, काबरा परिवाराच्या वतीने थंड पेय, स्वा.सावरकर चौकात सुधाकर बोरकर व मित्र परिवारच्या वतीने दूध वितरण करण्यात आले. शोभा यात्रेला नागभीड व नगर परिषद क्षेत्रातील जनतेने उत्तम प्रतिसाद दिला.

.        सदर शोभायात्रेत महिलांची लक्षनीय उपस्थिती होती. सर्वं महिला जय जय श्रीराम च्या घोषणा देत होत्या.बाल, युवा, प्रौढ सर्व एक हृदयाने या शोभायात्रेत सहभागी झाले होते. सदर शोभा यात्रेच्या प्रसंगी श्रीरामनवमी उत्सव समितीचे मार्गदर्शक आमदार बंटी भांगडिया यांनी भेट दिली व प्रभू श्रीराम यांच्या प्रतिमेचे दर्शन घेतले. तसेच मेघा मितेश भांगडिया, अपर्णा भागडिया यांनी सुद्धा भेट देत महिलामध्ये सहभागी झाल्या यामुळे उपस्थित सर्व महिलांचा उत्साह द्विगुणित झाला. शोभा यात्रे प्रसंगी विविध ठिकाणी प्रभू श्रीराम, माता सीता व लक्ष्मण विराजमान असलेल्या रथाचे पूजन करण्यात आले.

error: Content is protected !!