Home सामाजिक रत्नमाला चौकात सेवार्थ पाणपोई

रत्नमाला चौकात सेवार्थ पाणपोई

998

वरोरा : चंद्रपूर-नागपूर हायवे लगत वरोरा शहराच्या दर्शनी व वर्दळीच्या रत्नमाला चौकात रामनवमी च्या पर्वावर भागवत आयोजन समीती तथा विदर्भ महिला क्रेडीट को-आँपरेटिव्ह सोसायटी लि.वरोरा यांचे सौज्न्याने सेवार्थ पोणपोई सुरू करण्यात आली.

.      उन्हाळ्याच्या दिवसात प्रवाशांची तृष्णा भागावी म्हणून सेवार्थ पाणपोई उभारण्यात आली. या पाणपोइचे उदघाटन ह.भ.प बोरवटकर महाराज व मुख्याधिकारी विशाखा शेळकी न.प. वरोरा यांच्या हस्ते करण्यात आले. सेवार्थ पाणपोई चे दुसरे वर्ष असून या वषीँसुद्धा प्रवाशांकरीता दोन ते अडीच महिने पर्यत पाणी कँन दिवसभर उपलब्ध राहणार असल्याची माहीती राजेश कावलकर यांनी दिली.

.        कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी अविनाश नेवास्कर होते तर प्रमुख अतिथी विदर्भ महिला क्रेडीट सोसायटी वरोरा चे संचालक विजय गोटे, प्रमोद लांबट उपस्थित होते. वाहतूक पोलीस नियंञण विभागाचे विजय चिकणकर तसेच श्याम सरकटे यांचे मोलाचे सहकार्य लाभले या सेवार्थ पाणपोई व यज्ञ कुंडात खारीचा वाटा म्हणून अर्थरूपी समिधा देण्याचे आवाहन करून गजानन शेळके यांनी सर्वाचे आभार मानले.

error: Content is protected !!