नागभीड : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणाऱ्या एनएमएमएस स्कॉलरशिप परीक्षा 2024-25 चा निकाल नुकताच जाहीर झाला. यात कृषक विद्यालय कोटगांवचे 9 विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले.
. सदर परीक्षेत कृषक विद्यालय येथील 16 विद्यार्थी बसले होते. यापैकी 11 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. 09 विद्यार्थी एनएमएमएस शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले. निवड झालेल्या विद्यार्थ्यास प्रत्येक वर्षाला 12 हजार रुपये याप्रमाणे 48 हजार रुपये स्कॉलरशिप देण्यात येते. यामध्ये सानिका योगराज पिसे, उत्कर्षा मोहन मेंढे, युक्ती विनोद हुकरे, सुहानी दौलत शिवणकर, अनुष्का ओमप्रकाश कावडकर, तनुश्री देवानंद मेंढे, विकी रवींद्र थोटे, उत्कर्ष किशोर मोहरकर, नैतिक संतोष कुंभरे व उत्तीर्ण विद्यार्थ्यांतील सोहम दौलत शिवणकर हा विद्यार्थी सारथी शिष्यवृत्तीस पात्र ठरला.
. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रवीण पिसे यांनी पुष्प देऊन अभिनंदन केले. शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय मुख्याध्यापक प्रवीण पिसे मार्गदर्शक शिक्षक एन.एल. ठाकरे, एम. पी. मंदे, पी. एन.बारसागडे, आर.एम .चंदनखेडे, आर. पी.इरपाते, डी. डी. सुकारे, बी.एन. गोडे यांना दिलेले आहे.


