परळी : केंद्रात व राज्यात आरएसएसच्या विचारधारेचे भारतीय जनता पार्टीचे सरकार सत्तेवर असून संपूर्णपणे शेतीमालाचे भाव हमीभावा पेक्षा कमी करून शेतकऱ्याला आर्थिक कोंडीत टाकून बळीराजाचे स्वप्न उत्पन्न दुप्पट करण्याचे देखावा करून शेतकरी आर्थिक संकटात अडकविण्याचा गंभीर आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष वसंत मुंडे यांनी केला.
. आपल्या देशामध्ये खरीप रब्बीचे शेतातीलाचे उत्पन्न तयार झाले की परदेशातून सर्व प्रकारचा शेतीमाल ठराविक टक्केवारी देणाऱ्या व्यापाऱ्यामार्फत मागून घेऊन संपूर्ण देशातील शेतकऱ्याच्या शेतीमालाचे भाव पाडून शेतकऱ्याचे जीवन उध्वस्त करण्याचा आरएसएस विचारधारेच्या केंद्रात व राज्यातील सरकारचा अजिंठा आहे. शेतीमाल परदेशातून आयात करताना आर एस एस बीजेपीच्या व्यापाऱ्याकडून अमेरिका ब्राझील अर्जेंटिना चीन या देशात सोयाबीनचे उत्पन्न मोठ्या प्रमाणावर होते. भारत देशातील सोयाबीन ची मागणी व पुरवठा आणि उपभोग या घटकांमध्ये होणाऱ्या बदलाचा परिणाम सोयाबीनच्या कापूस इतर शेतीमालाच्या किंमतीवर होत असतो. सरकारच्या चुकीच्या आयात निर्यात धोरणामुळे शेतीमालाचे भाव नसल्यामुळे शेतकरी आर्थिक दृष्ट्या चिंताजनक असून संपूर्ण शेतीमालाला योग्य भाव मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यापुढे आर्थिक संकट उभे राहत असल्यामुळे आत्महत्या वाढत आहेत . शेतकऱ्याच्या दैनंदिन कुटुंबाचा खर्च भागवणे अडचणीचे झाले आहे. तरीही केंद्र व राज्य सरकारला काहीही देणे घेणे नाही. एकीकडे शेतीमधील खते बी बियाणे कीटकनाशक औषधी ट्रॅक्टर खर्च खुरपणी फवारणी मळणी यंत्र मजुरी दैनंदिन खर्च वाढल्यामुळे व शेतीमालाला भाव नसल्यामुळे शेती परवडत नाही .उत्पादनातून खर्च निघणे शक्य नाही, त्यामुळे सर्व बाजूने शेतकऱ्याला शासनाने आधार देणे काळाची गरज आहे. शासनाचे बाजारपेठेवर नियंत्रण नाही.
. हमीभावापेक्षा कमी भावाने शेतकऱ्याचा शेतीमाल बाजारपेठेतून खरेदी केला जात आहे. शासनाकडून कोणतेही कारवाई केली जात नाही. शासनाकडून आधारभूत किंमत शेतीमालाला मिळत नाही. अतिवृष्टी दुष्काळ पिक विमा विविध योजनांचे अनुदान आज तागायत शेतकऱ्याच्या खात्यात वर्ग केलेले नाहीत. निष्क्रिय केंद्र व राज्यातील सरकार शेतकऱ्याला संपवण्याचे षडयंत्र रचित असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे नेते वसंत मुंडे यांनी केला.


