त्या नऊ ट्रॅक्टर चालकावर गुन्हे दाखल

27

अवैध रेती वाहतूक

नेरी : नेरीवरून जवळ असलेल्या हरणी नदीघाटावर अवैध रेती तस्करी करण्यासाठी गेलेले नऊ ट्रॅक्टर गावकऱ्यांनी पकडून पोलीस विभागाला पाचारण करून त्यांच्या स्वाधीन केल्या सदर सर्व ट्रॅक्टर पोलीस स्टेशन मध्ये जमा करून पोलिसांनी जप्तीची कारवाई करीत सर्व ट्रकटर चालकावर बी एन एस एस कलम 128 नुसार गुन्हा दाखल केला आहे आणि पुढील कारवाईसाठी महसूल विभागाला पत्र दिले असल्याची माहिती असून पुढील कारवाई महसूल विभाग करणार असे पोलीस विभागाने माहिती दिली आहे.

.     सदर ट्रकटर पोलीस स्टेशनमध्ये जप्त असून चालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर चालक विजय पतरु मेश्राम सावरगाव, अमोल खुशाल दडमल नेरी, नंदू कनिराम शेरकी वडाळा पैकू, कैलास हरिदास ननावरे नेरी, विकल्प दिनकर ननावरे नेरी, मंदार जगदीश ढोने नेरी, रतन श्रत्री मेश्राम सावरगाव, लखन संतोष श्रीरामे सोनेगाव, संदीप देवराव ननावरे नेरी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास चिमूर पोलीस करीत आहेत.