वरोरा : 100 दिवस कृती आराखड्यांतर्गत जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांनी आठवडयातून किमान दोन दिवस क्षेत्रीय भेटीदरम्यान केंद्र व राज्य शासनाच्या प्रकल्पांना भेटी देऊन कामाच्या प्रगतीची पाहणी करावी, अशा राज्य शासनाच्या सुचना आहेत. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी वरोरा तालुक्यातील विविध गावांना भेटी देऊन विकास कामांची पाहणी केली.
![]()
. तालुक्यातील भटाळा येथील मागील वर्षा पासून भटाळा – कोटबाळा शिवपांदन रस्त्याचे काम महात्मा गांधी रोजगार हमीतून चालू आहे. या कामाबाबत आढावा घेऊन तालुका प्रशासन पुढील काम पूर्ण करून आता पर्यंत झालेल्या मातकामावर मुरूम टाकण्यात यावे तसेच पुढे पण काम करून शेतकरी यांना सोयीस्कर होईल असा मार्ग बनवून दया, तसेच भोळ्या शंकर मंदिराच्या पुरातन विभागामार्फत चालू बांधकामा संदर्भात पाहणी केली. या नंतर ते ऋषी तलाव च्या सौंदर्यकरण बाबत झालेल्या बांधकामाची पाहणी करून पुढे यापेक्षा काय करता येईल याची पाहणी करून संबंधित विभागाला सूचना दिल्या.
. यावेळी तहसीलदार योगेश कौटकर, नायब तहसीलदार काळे, सवर्ग विस्तार अधिकारी मुंडकर, सार्वजनिक बांधकाम अभियंता लोहे, सचिव सुखदेवे, तलाठी जाधव, भटाळा येथील ग्रामपंचायत सरपंच धम्मकन्या भालेराव, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक हरिष जाधव, रोजगार सेवक दिलीप तुमसरे, चपराशी मारुती बावणे, ग्रामपंचायत सदस्य माणिकराव जांभुळे तसेच गावकरी उपस्थित होते.


