ब्रह्मपुरी : जवाहर नवोदय विद्यालय इयत्ता सहावी करीता सन 2024 25 मध्ये प्रवेश परीक्षा घेण्यात आली. त्यामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जुगनाडा येथील पाचव्या वर्गात शिकणाऱ्या ओमखेत शालिकराम मैंद व युग विजय जगनकर या दोन विद्यार्थ्यांनी घवघवीत यश प्राप्त करून नवोदय विद्यालयाच्या प्रवेशाचा दार ठोठावला आहे. विशेष म्हणजे कुशाग्र बुद्धिमत्तेच्या जोरावर व प्रतिकूल परिस्थितीवर मात करून ग्रामीण भागातील या विद्यार्थ्यांनी प्राप्त केलेल्या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे. ब्रह्मपुरी पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी मयूर लाडे व विस्तार अधिकारी तोराम आणि व्यवस्थापन समिती सदस्य व गावकरी यांनी सुद्धा भरभरून कौतुक केलेले आहे.
. सदर विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय आई-वडील तसेच जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक गजानन प्रधान, वर्गशिक्षिका प्रभा गणवीर, संगीता वैद्य, गोवर्धन टिकले, योगराज बोरकुटे, धनपाल दमके, स्वाती लांडेकर आणि गोपाल राऊत या गुरुजनांना दिलेले असून पुढील वाटचालीसाठी त्यांनी विद्यार्थ्यांना भरभरून शुभेच्छा दिलेल्या आहेत.


