Home सामाजिक आनंद निकेतन महाविद्यालयाच्या कर्मचार्याभचा वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर

आनंद निकेतन महाविद्यालयाच्या कर्मचार्याभचा वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर

819

३३ रक्तदात्यानी केले रक्तदान

चंद्रपुर

.             आनंद निकेतन महाविद्यालय वरोरा येथे कार्यरत असलेले कर्मचारी प्रमोद नागापुरे यांच्या वाढदिवसानिमित्त आनंद निकेतन महाविद्यालयात येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते . यात शिबिरात ३३ रक्तदात्यानी केले रक्तदान केले.

.             आनंद निकेतन महाविद्यालयाचे कर्मचारी प्रमोद नागापुरे हे दरवर्षी स्वत:चा वाढदिवसा रक्तदान शिबीर आयोजित करून साजरा करतात. त्यांच्या 43 व्या वाढदिवसानिमित्त 33 रक्तदात्यांनी रक्तदान केले. रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे. हा उपक्रम त्यांनी हाती घेऊन दरवर्षी वाढदिवसाला रक्तदान शिबिराचे आयोजन करण्याचे ठरविले आहे. रक्त संकलना करिता जिल्हा वैद्यकीय महाविद्यालय, चंद्रपूर ची चमू आलेली होती. रक्त संकलन च्या मध्ये वैद्यकीय अधिकारी डॉ. देवकर, समाजसेवा अधीक्षक पंकज पवार, रक्तपेढीत तंत्रज्ञ आनंद जिद्देवार, रक्तपेढी तंत्रज्ञ विकी भगत व इतर सहकारी चमू सहभागी होते. रक्तदान शिबिराला भेट देण्याकरिता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मृणाल काळे आले होते. या रक्तदान शिबिरात विशेष रक्तदाते म्हणून पंचायत समिती वरोरा चे गट शिक्षणाधिकारी ज्ञानेश्वर चाहारे, आर्मी सैनिक(माजी विद्यार्थी) संकेत सरपाते  यांनी विशेष रक्तदाते म्हणून उपस्थिती दर्शविली प्रत्येक रक्तदात्याला एक टिफिन बॉक्स भेट स्वरूपात आयोजन समितीकडून देण्यात आला.

.             रक्तदान शिबिरामध्ये खैरगाव मित्रपरिवार आनंदवन मित्रपरिवार महाविद्यालयातील विद्यार्थी व महाविद्यालयातील माजी विद्यार्थी यांनी रक्तदान शिबिरात सहभाग घेतला होता रक्तदान शिबिर यशस्वी करण्याकरिता प्राध्यापक तानाजी बायस्कर शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख, प्राध्यापक. संदीप पारखी एनसीसी अधिकारी, प्राध्यापिका. प्रियंका बुक्या, तुषार पारखी कमलाकर डुकरे वरिष्ठ लिपिक, देवानंद अलोने मुख्य लिपिक, कमलाकर खेवले, मंगेश करंबे, प्रेमदास हेमने आनंदवन,  आकाश राऊत, शंकर पर्वत यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

error: Content is protected !!