Home सामाजिक भव्य महाआरोग्य शिबीरात १५९० रुग्णांची तपासणी तर ३९२ रुग्णांना विविध शस्त्रक्रियेचे निदान

भव्य महाआरोग्य शिबीरात १५९० रुग्णांची तपासणी तर ३९२ रुग्णांना विविध शस्त्रक्रियेचे निदान

1083

गडचांदूर : राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार देवराव भोंगळे यांच्या संकल्पनेतून आणि आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्र तथा भाजपा गडचांदूर च्या वतीने स्थानिक स्व. भाऊराव पाटील चटप आश्रमशाळेत भव्य महाआरोग्य शिबीर पार पडले. या शिबीराचा गडचांदूर शहरासह परिसरातील १५९० रुग्णांची तपासणी तर ३९२ रुग्णांना विविध शस्त्रक्रियेचे निदान करण्यात आले.

.       या शिबीरात नेत्ररोग, सर्जरी, बालरोग, स्त्रिरोग, दंतरोग, कान-नाक-घसा, अस्तिरोग, त्वचारोग, मेडीसीन व कॅन्सर यांसारख्या रोगांवरील तज्ञ डॉक्टरांनी तपासणी केली. यामध्ये तपासणी झालेल्या १५९० रुग्णांपैकी ३९२ रूग्ण हे विविध शस्त्रक्रियेकरीता पात्र ठरले आहेत त्यांचेवर टप्प्या-टप्प्याने आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी (मेघे) येथे शस्त्रक्रिया पार पडतील.

.    आयोजक तथा आमदार देवराव भोंगळे आपल्या उद्घाटनीय मनोगतात म्हणाले की लोकनेते, विकासपुरुष आ. सुधीर मुनगंटीवार यांनी आम्हाला सेवेचा मंत्र दिला आहे. खरंतर सुधीर मुनगंटीवार यांच्या नावाचं समानार्थी शब्दच सेवा असा होतो आणि त्यांच्या सेवेचा वसा पुढे नेत मागील अनेक वर्षांपासून आम्ही आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्राच्या माध्यमातून अशाप्रकारे मोफत महाआरोग्य शिबीर आयोजित करून रुग्णसेवा देतो. आजच्या या महाआरोग्य शिबीरात १५९० एवढ्या संख्येने नागरिकांनी सहभाग नोंदवून आपल्या आरोग्यासंबंधी तपासण्या केल्या. अनेक गरजू माताभगिनींना यामुळे आजारांचे निदान व उपचार मिळविता आले.

.      या शिबिराच्या यशस्वीतेसाठी भाजपचे जिल्हा महामंत्री विवेक बोढे, तालुकाध्यक्ष संजय मुसळे, तालुका महामंत्री सतिश उपलेंचवार, शहराध्यक्ष अरूण डोहे, भाजप अनू जमाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अरूण मडावी, शहर महामंत्री हरीश घोरे, शंकर आपुरकर, प्रमोद कोडापे, रामसेवक मोरे, महेश घरोटे, भास्कर उरकुडे, अरविंद एकरे, शिवाजीराव सेलोकर, पुरुषोत्तम भोंगळे, गोपाल मालपाणी, शेख मेहताब, आशिष ताजने, धम्मकीर्ती कापसे, जगदीश पिंपळकर, प्रमोद पायघन, भाजममोच्या जिल्हा महामंत्री विजयालक्ष्मी डोहे, शहराध्यक्षा शितल धोटे, अपर्णा उपलेंचवार, उमा कंठाळे, नमिता विश्वास सपना सेलोकर, विना मुद्दलवार, रंजना मडावी, जयंता भोंगळे, गजानन शिंगरू, पुरुषोत्तम ठाकरे, गणपत पुराटकर, रामेश्वर सिंग, धर्मेंद्र सिंग, सत्यदेव शर्मा, सोमेश्वर सोनकांबळे, विलास केवट, विनोद बत्तूलवार, रमेश चुदरी, योगेश बांदुरकर, परशुराम मुसळे, सागर धुर्वे, प्रवीण सातपाडे, विजय बोरकुटे, विनायक चौधरी, प्रशांत गौरशेट्टीवार, अमोल बावणे, दिवाकर आगलावे, विठ्ठलराव धांडे, रामचंद्र खामनकर, विलास जगनाडे, योगेंद्र केवट, रामचंद्र वासाडे, संदीप शिंदे, मंगेश चौधरी, श्रीकांत सातपुते, विनोद इंगळे, प्रीती सातपाडे, पूजा वाघमारे, भारती गोखले, द्रुपदा कातवटे, त्रिवेना जगताप, वृंदा चौगुले, अश्विनी वाघाडे, जयश्री येरेकर, पायल येलमुले, भालेराव, शालिक बेले, दुर्गा प्रसाद, हलमारे, आशा धनवलकर, अर्चना आंबेकर, सुंदर दाढे, संगीता पातुरकर, भार्गव, चौधरी, गीता बोंद्रे यांचेसह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

error: Content is protected !!