भद्रावती : स्त्रीमध्ये असते शक्ती अपार …..
ती आहे सृष्टीचा आधार !
करा तिचा नेहमी सन्मान ……
कारण तीच आहे प्रत्येकाच्या जीवनाचे सार !
पोलीस स्टेशन भद्रावती येथे दि 8 मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त पोलीस स्टेशनचा नव्याने पदभार घेतलेल्या महिला ठाणेदार वाढीवे यांच्या अध्यक्षतेखाली जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला.
. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पोलीस सहाय्यक निरीक्षक केदारे, पोलीस उपनिरीक्षक गेडाम, पोलीस पाटील संघटनेचे जिल्हा अध्यक्ष योगेश मत्ते हे होते. तर कार्यक्रमाचे उद्घाटक जिल्हा महिला आघाडी सुनीता ठोंबरे, तालुका अध्यक्ष राजेंद्र पोईनकर, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख संतोष बागेसर, तालुका सचिव देऊबाबा परशे, सपना कातकर व कार्यक्रमाला उपस्थित पोलीस महिला कर्मचारी, उपस्थित पोलीस कर्मचारी, पोलीस पाटील संघटनेचे सर्व पदाधिकारी आणि सर्व पोलीस पाटील उपस्थित होते. सर्वांच्या उपस्थितीत जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. त्यावेळी अध्यक्षिय भाषनात जागतिक महिला दिनानिमित्त मार्गदर्शन केले.
तसेच जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून भद्रावती पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या उत्कृष्ट कामगिरी बजावलेल्या पोलीस पाटील महिला अन्नपूर्णा नन्नावरे रा. भामडेली यांचा ठाणेदार वाढीवे यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला. पोलीस स्टेशन भद्रावती येथे जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम पार पाडण्यात आला.


