Home सामाजिक महिलांनी प्रत्येक क्षेत्रात उंच शिखर गाठावे – खा. प्रतिभा धानोरकर

महिलांनी प्रत्येक क्षेत्रात उंच शिखर गाठावे – खा. प्रतिभा धानोरकर

1076

चंद्रपुर : महिला प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर असून त्यांनी आता फक्त उंच शिखर गाठण्याची आवश्यकता असल्याचे मत खासदार प्रतिभा धानोरकर यांनी बाबुपेठ येथे महिला दिना निमित्त आयोजीत महिला मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी केले.

.    बाबुपेठ येथे महिला बचत गटाच्या वतीने महिला मेळाव्याचे आयोजन दि. 08 मार्च रोजी करण्यात आले होते. या मेळाव्याच्या उद्घाटीका व महिला मेळाव्याच्या अध्यक्ष स्थानी खासदार प्रतिभा धानोरकर उपस्थित होत्या. यावेळी खासदार प्रतिभा धानोरकर महिलांना संबोधित करताना म्हणाल्या की, महिला प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर असून सर्व क्षेत्रात उंच शिखर गाठावे. चुल-आणि मुल हि संकल्पना मागे पडली असून देशाच्या सर्वोच्च स्थानापासून तर सर्व क्षेत्रात महिलांनी बाजी मारली आहे. आज महिला सक्षमीकरणा बरोबरच आरोग्य सक्षमीकरण तेवढेच आवश्यक आहे. त्याकरीता आपण आपल्यासह कुंटूंबाची देखील काळजी घेणे आवश्यक आहे.

.      यावेळी महिला मेळाव्यात महिलांसाठी विविध सांस्कृतीक कार्यक्रमांचे आयेजन करण्यात आले होते. विजेत्या महिलांचा सत्कार देखील यावेळी करण्यात आला. यावेळी मंचावर चंदा वैरागडे यांच्यासह इतर मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी शेकडो महिलांची उपस्थिती होत्या.

error: Content is protected !!