*जनकापूर येथे “एक गाव एक गणपती” तर ‘ एक गाव एक शारदा ‘

40

ऐकविस वर्षांची परंपरा आजही कायम

नागभीड

.           तालुक्यातील जनकापूर येथील मागील ऐकविस वर्षांपासून सुरू असलेली “एक गाव एक गणपती” ची परंपरा कायम असून या गावात सर्व धर्मीय लोक असून या गावात अजूनही एकोपा बघायला मिळतो.

.           गावात ऐकविस वर्षापासून श्री बाल गणेश मंडळ गोवर्धन चौक जनकापूर यांचे विद्यमाने “एक गाव एक गणपती” तर, शारदा महिला मंडळ यांचे वतीने “एक गाव एक शारदा” उत्सव तसेच गुरुदेव मंडळ यांचे वतीने “कार्तिक पौर्णिमा उत्सव” मोठ्या थाटात साजरा करण्यात येतो हे या गावातील परंपरा अजूनही कायम असून सर्व धर्मीय लोक गावात सुरू असलेल्या या कार्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहतात.

.           अनंतचर्थुर्थी ला गणपतीचा गोपालकला तसेच सामूहिक भोजन करण्यात येतो व सकाळी सर्व गावातील नागरिकांच्या उपस्थिती मिरवणूक काढून गणरायाचं विसर्जन करण्यात येतो. यामध्ये बालगणेश मंडळाचे अध्यक्ष किशोर गुरूनुले, सचिव अक्षय पडोळे, उपाध्यक्ष चंद्रशेखर मसराम, ज्ञानेश्वर पडोळे, सुखदेव मानापुरे, सिआरएफ जवान नितून बावनथडे, राकेश बावनकर, अनिल पडोळे, भारत दिघोरे, प्रविन बावनथडे, सचिन मसराम, मोरेश्वर मेश्राम, लेखू मेश्राम, प्रणीत बावनकर, तसेच गावातील सर्व नागरिकांनी मोलाचे सहकार्य केले.