Home सामाजिक गडचांदूर येथे ईद मिलादुंनबी उत्साहात

गडचांदूर येथे ईद मिलादुंनबी उत्साहात

809

गडचांदूर

.           गडचांदूर येथे दर वर्षी प्रमाणे याही वर्षी जशने ईद मिलादूनंबी उत्साहात संपन्न झाली. या वेळी गडचांदूर मधील रजा मस्जिद येथून मिरवणूक निघाली ,तत्पूर्वी येथील मदिना मस्जिद, अक्सा मस्जिद येथील जुलूस गांधी चौकातील रजा मसजिद येथे आले व तिन्ही मस्जिद ची मिरवणूक सामूहिक रित्या गांधी चौकातून निघाली.

.           पोलिस स्टेशन समोरून माणिकगड कंपनी चौक ते पेट्रोल पंप चौक होत बसस्थानक मार्गे शेडमाके चौक होत महात्मा फुले चौक होत गांधी चौकात विसर्जित झाली. येथील रजा मस्जिद येथे जोहर ची नमाज अदा करून दुरुद खानी,फातेहा खानी नंतर सामूहिक भोजन संपन्न झाले. व जुलूस संपन्न झाला.

.           या जुलस मध्ये कामठी येथील मटका पार्टी ने लोकांची मने जिंकली, तसेच या साठी रजा मस्जिद चे हाफिज हसनैन, रजा मस्जिद चे मौजन, मस्जिद चे अध्यक्ष शेख खाजा भाई, अक्सा मस्जिद चे हाजी मूनाफ कुरेशी, मदिना मस्जिद चे हाजी जुबेर, हाजी वसीम थेकेदार हनीफ मावडिया, रउफ खान, माजी पंचायत समिती सभापती, अजीम बेग, इर्शाद कादरी, अनिस कुरेशी, ए आय एम आय एम चे अध्यक्ष अब्दुल हफिज, पत्रकार रफिक सह शेकडो नागरिक हजर होते. जुलूस शांततेत पार पडला. खाजा भाई यांनी सर्वांचे आभार मानले.

error: Content is protected !!