15 मार्च पर्यंत नोंदणी करण्याचे बाजार समितीचे आवाहन
खरेदी बंदच
शेतकऱ्यांचे चिंतेत वाढ
नेरी : चिमूर तालुक्यातील सीसीआय ची कापूस नोंदणी व खरेदी बंद झाल्याची बातमी विविध वृत्तपत्रात प्रसारित झाली होती. त्याचीच दखल घेत तालुक्यातील सर्व कापूस उत्पादक शेतकरी बांधव सीसीआय ला शासकीय हमिदराचा लाभ व्हावा यासाठी सीसीआय अकोला कार्यालयच्या वतीने बाजार समिती चिमूर ला प्राप्त पत्रानुसार 15 मार्च 2025 पर्यंत कापूस विक्री करीता येईल असे पत्र प्राप्त झाले आहे. त्यामुळे पुन्हा बाजार समिती चिमूर चे वतीने मे.विठ्ठल रुखमाई जीनिंग इंडस्ट्री, भीसी येथे कापूस उत्पादक शेतकरी बांधवांना नोंदणी ची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली असून नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांच्याच कापूस खरेदी केला जाईल असे आवाहन बाजार समिती द्वारे करण्यात आलेले आहे.
तेव्हा शेतकऱ्यांनी दिनांक 15.03.2025 च्या आत नोंदणी करून घ्यावी असे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समिती चिमूर चे सभापती मंगेश धाडसे, उपसभापती रवींद्र पंधरे व सर्व संचालक गण यांनी केले आहे.


