Home सामाजिक तळोधीत रविवारी होणार महामेळावा व कलाकार सन्मान सोहळा

तळोधीत रविवारी होणार महामेळावा व कलाकार सन्मान सोहळा

1084

नागभीड : तालुक्यातील तळोधी (बा.) येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर देवस्थान येथे अखिल भारतीय कलावंत न्याय हक्क समितीच्या वतीने विदर्भातील संपूर्ण कलावंतांसाठी ‘नोंदणी महामेळावा व कलाकार सन्मान’ सोहळ्याचे आयोजन रविवार दि. 9 मार्च रोजी सकाळी 10 वाजता करण्यात येत आहे.

.      या कार्यक्रमाला मुख्य मार्गदर्शक म्हणून अखिल भारतीय कलावंत न्याय हक्क समितीचे संस्थापक  तथा सुप्रसिद्ध गायक सोमनाथ गायकवाड यांची उपस्थिती लाभणार आहे. तर प्रमुख अतिथी म्हणून समितीचे राष्ट्रीय संघटक बलराज आहेर व अन्य विदर्भातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या महामेळाव्यात संपूर्ण विदर्भातील कला क्षेत्रातील कवी, गायक, साहित्यिक, लेखक, अभिनय, नाटककार, निर्माता, दिग्दर्शक, संगीत विशारद, शास्त्रीय गायन, सुगम गायन, भजनी मंडळ, कीर्तनकर, भारुडकार, प्रवचनकर, तमाशा कलावंत, ऑर्केस्ट्रा कलावंत, डान्सर, जागरण, गोंधळ, बहुरुपी, आराधी, गोंधळी, देवदासी, पोतराज, वासुदेव, पिंगुळ, नंदी बेल, महिला-पुरुष ढोल पथक, बेंजो – ब्रास बँन्ड पथक, आदिवासी कला पथक, झाडीपट्टी कलावंत आदीं या सर्व कलावंतांची नोंदणी होणार असून काही कलावंतांचा सत्कार सुद्धा होणार आहे.

.      शिवाय कलावंतांच्या उपवर मुलं- मुलींचा वधू-वर परिचय मेळावा सुद्धा पार पडणार आहे. कलाकार नोंदणी साठी 3 पासपोर्ट, आधार कार्ड व काही नोंदणी शुल्क लागणार आहे. या कार्यक्रमाचा लाभ संपूर्ण विदर्भातील कलावंतांनी घ्यावा. व उपस्थिती दर्शवून नोंदणी करून घ्यावी. असे आवाहन आजोजक समितीने केले आहे.

error: Content is protected !!